Team India : भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये टी 20  नंतर वनडे मालिका गमावली,  तीन खेळाडूंसाठी टीमची दारं बंद?


नवी दिल्ली : भारताचा लॉर्डसवरील तिसऱ्या वनडे सामन्यात 27 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. टी20 मालिका आणि त्यानंतरची वनडे मालिका भारतानं गमावली. टी 20 मालिका आणि वनडे मालिकेत भारताला केवळ एका वनडे मध्ये विजय मिळाला. भारतानं वनडे मालिका 2-1 नं गमावली. तिसऱ्या वनडेत भारताकडून कॅप्टन शुभमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं दमदार फलंदाजी केली मात्र गोलंदाजी चांगली झाली नाही. इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 387 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभम गिल वगळता इतर फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. भारताच्या सलग पराभवांमुळं काही खेळाडूंसाठी टीम इंडियाची दारं बंद होऊ शकतात.  

हार्दिक पांड्या वनडे मालिकेत खेळत नव्हता. हर्षित राणा देखील वनडे मालिकेत खेळू शकला नाही. ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डी देखील दुखापतग्रस्त झाल्यानं संघाबाहेर गेला होता. या तिघांच्या गैरहजेरीत काही खेळाडूंना संधी मिळाली, मात्र ते चांगली कामगिरी करु शकले नाहीत. त्यामुळं टीम इंडियाची दारं त्या खेळाडूंसाठी बंद होऊ शकतात.  

शिवम दुबे

वनडे आणि टी 20 वेगवान गोलंदाज ऑलराऊंडर म्हणून टीम मॅनेजमेंटची पहिली पसंत हार्दिक पांड्या आहे. मात्र, हार्दिक पांड्या उपलब्ध नसल्यानं नितीश कुमार रेड्डीला संधी दिली होती, मात्र तो दुखापतग्रस्त झाला. यामुळं शिवम दुबेला संधी मिळाली. शिवम दुबे 2 मॅचमध्ये 2 विकेट घेऊ शकला. तर, फलंदाजी करताना एका मॅचमध्ये त्याला खातं उघडता आलं नाही.  

ईशान किशन

अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत विराट कोहली दुखापतीमुळं खेळला नव्हता. यामुळं ईशान किशनला तिसऱ्या स्थानावर संधी मिळाली होती. एका मॅचमध्ये त्यानं शतक केलं होतं. त्यामुळं इंग्लंड विरोधातील वनडे मालिकेत त्याला संधी मिळाली होती. ईशान किशनला दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेत संघात स्थान मिलालं. मात्र, तो चांगली कामगिरी करु शकला नाही.  

प्रिन्स यादव

वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवनं अफगाणिस्तान विरोधातील मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. इंग्लंड विरोधातील तिसऱ्या वनडेत त्याला संधी देण्यात आली होती.  मात्र, त्यानं एक विकेट घेत 10 ओव्हरमध्ये 79 धावा केल्या. अफगाणिस्तान विरोधातील वनडे मालिकेत देखील त्यानं खूप धावा दिल्या होत्या. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *