शिर्डीत महिलांचे गुंडाराज? किरकोळ वादातून भररस्त्यात हत्या, साईनगरीत खळबळ – Marathi News | Shirdi fruit vendor murder woman stabbed to death near sai temple two women arrested


शिर्डीच्या साई मंदिर परिसरात फळ विक्रेत्या महिलेने दुसऱ्या एका फळ विक्रेत्या महिलेवर चाकूने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास साई मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक चार समोर भर गर्दीत महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जखमी जयश्री साईनाथ क्षीरसागर, वय 30, हिचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आरोपीसह तिच्या साथीदार महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

किरकोळ वादातून महिलेची हत्या

साई मंदिर परिसरात वर्दळीच्या ठिकाणी फळ विक्रेत्या महिलेने दुसऱ्या महिलेवर धारधार चाकूने वार करून हत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणाहून झालेला वाद थेट चाकू हल्ल्यापर्यंत आणि हत्येपर्यंत पोहचला. या प्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिजा पटेल (वय 21) या मुख्य आरोपीसह तिची साथीदार अंजली खांडीझोड (वय 22) या दोन आरोपी महिलांना पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. शिर्डीत आता तरुणांच्या टोळक्यांसह महिलांचा गुंडराज सुरू झालाय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

पालकमंत्र्यांचा मोठा निर्णय

या घटनेनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिर्डीतील गुन्हेगारीचा आढावा घेत, पोलिसांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. महिलेच्या हत्या प्रकरणानंतर आता शिर्डीत रस्त्यावर, फुटपाथवर विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. शहरातील हॉटेल आणि दुकानदारी किती वाजेपर्यंत चालवायची याबाबत विखे पाटलांनी प्रशासनाला निर्देश दिले असून, गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी स्थानिक लोकांनी देखील पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

आरोपींना अटक

या प्रकरणावर बोलताना शिर्डीचे पोलिस उपअधिक्षक अमोल भारती यांनी सांगितले की, 19 जुलै रोजी रात्री 9.30 च्या आसपास साई समाधी मंदिराच्या गेट नंबर 4 जवळ झालेल्या हत्येत महिला आरोपींवर बीएनएस कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल क गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्याच त्या नशेत होत्या हे समोर आलेलं नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *