Kangana Ranaut Queen 2 Marathi Actor: अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘भारत भाग्य विधाता’ या हिंदी चित्रपटामुळे चर्चेत होती. दरम्यान तिच्या ‘क्विन 2’ (Queen 2) या चित्रपटाची ही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. नुकतंच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून, निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या रॅप-अप व्हिडीओमधून ही माहिती दिली. पण, आता या चित्रपटासाठी लीड अभिनेता कोण असणार यावरूनही चर्चा रंगली होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झालं आहे. कंगना रनौतसोबत मराठीतील लोकप्रिय अभिनेता लीड रोलमध्ये झळकणार आहे.
‘क्वीन 2’मध्ये झळकणार हा अभिनेता
कंगना रनौत ‘भारत भाग्य विधाता’नंतर आता क्वीन 2 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहल करत आहेत. त्यांनी याआधी शैतान सारख्या यशस्वी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘क्वीन 2’मध्ये कंगनासोबत कोणता अभिनेता दिसणार याबाबत उत्सुकता होती. आता ई-टाईम्सच्या रिपोर्टनुसार मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) या चित्रपटात लीड भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आलं आहे.
शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सेटवर रॅप-अप सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी कंगना रनौत दिग्दर्शक विकास बहल यांना केक भरवताना दिसली. या सेलिब्रेशनमध्ये तिच्यासोबत सुबोध भावेही उपस्थित होते. त्यामुळे आता सुबोध भावेच ‘क्वीन 2’चे लीड हिरो असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.विशेष म्हणजे, सुबोध भावे आणि कंगना रनौत पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.
सुबोध भावे यांचे लोकप्रिय चित्रपट
मराठी सिनेसृष्टीतील सुबोध भावे हे नाव माहित नाही असं होणार नाही. अनेक लोकप्रिय चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. सध्या झी मराठीवरील ‘वीण दोघांतली तुटेना’ या मालिकेत सुबोध भावे प्रमुख भूमिकेत आहेत. सुपरस्टार अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मराठी मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवली आहे. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये बालगंधर्व, लोकमान्य एक युगपुरुष, आणि डॉ काशिनाथ घाणेकर,हर हर महादेव अशा अनेक सिनेमांचा समावेश होतो. कंगना रनौतसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता आता वाढली आहे.
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा