Last Updated:
टीम इंडियातून निवृत्ती घेतलेल्या एका खेळाडुने दुसऱ्या देशाकडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर त्याने आपल्या फलंदाजीची चुणुक दाखवली आहे.
KS Bharat News : टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूने जुनच्या पहिल्याच आठवड्यात निवृत्तीची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सर्वांनाच धक्का बसला होता. पण या निवृत्तीच्या काही दिवसात खेळाडुने दुसऱ्या देशातून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेता होता.या निर्णयानंतर टीम इंडियाच्या या खेळाडूने आपल्या बॅटींगची
चमक दाखवली आहे. या खेळाडूने दुबईत वादळी खेळी केली आहे. या खेळीमुळे त्याने पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून भारताचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज के.एस. भरत आहे. के.एस. भरतने 4 जून रोजी वयाच्या 32 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. या निवृत्तीने सगळ्यांनाच धक्का बसला होता.पण त्यानंतर तो युएईकडून क्रिकेट खेळणार असल्याची माहिती समोर आली होती.
18 जून रोजी अमिराती क्रिकेट बोर्डाने दोन दिवसीय सामन्यांसाठी चार संघांची घोषणा केली आणि यापैकी एका संघात के.एस. भरतचा समावेश केला होता. त्याचा समावेश ‘टीम स्टॅलिअन्स’मध्ये करण्यात आला होता.हरप्रीत भाटिया आणि अक्षदीप नाथ यांसारख्या माजी भारतीय क्रिकेटपटूंचीही निवड झाली आहे.हे खेळाडू 19 जुलै ते 5 जुलै दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होतील. यामध्ये एकूण सात सामने खेळले जातील.
Ex India keeper KS Bharat made 70 in 80 balls in domestic two day comp this evening. Unclear yet whether he plans to commit to playing for UAE, but they’re happy to accomodate him
📸 by @PressSnapper pic.twitter.com/d7TcPmzym1
— Paul Radley (@PaulRadley) June 24, 2026
दरम्यान यानंतर आता केएस भरतने डॉमेस्ट्रीक क्रिकेटच्या दोन दिवसांच्या कॅम्पमध्ये 80 बॉलमध्ये 70 धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. दरम्यान तो युएई संघाकडून खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही, पण युएई संघ त्याला संघात सामावून घेण्यास तयार आहे.
जरी भरतने भारतीय क्रिकेट सोडून युएईमध्ये (UAE) प्रवेश केला असला तरी, तो फेब्रुवारी 2027 पर्यंत आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर, जर एखादा खेळाडू पूर्ण सदस्य देशाकडून सहयोगी देशाकडे गेला, तर त्याला तीन वर्षांचा ‘कूलिंग-ऑफ’ कालावधी आवश्यक असतो. भरतने 2 ते 5 फेब्रुवारी दरम्यान इंग्लंडविरुद्ध भारतासाठी एक कसोटी सामना खेळला होता. त्यामुळे, त्याचा ‘कूलिंग-ऑफ’ कालावधी फेब्रुवारी 2027 पर्यंत कायम आहे. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकेल. तथापि, यादरम्यान, हा यष्टीरक्षक-फलंदाज युएई आंतरराष्ट्रीय टी-२० लीगमध्ये खेळू शकेल.
भरतने फेब्रुवारी 2023 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान भारतासाठी एकूण सात कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने 221 धावा केल्या आणि 18 झेल घेतले. ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाल्यानंतर त्याला ही संधी देण्यात आली होती.तो 2023 च्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारतीय संघाचा भाग होता. भरतने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्रकडून आणि इंडिया ‘अ’ संघाकडून अनेक सामन्यांमध्ये खेळला आहे. आयपीएलमध्ये तो गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघांकडून खेळला आहे.
Mumbai,Maharashtra
Jun 24, 2026 11:20 PM IST
KS Bharat : 20 दिवसांपूर्वी घेतलेली रिटायरमेंट, टीम इंडियाचा क्रिकेटर दुबईत चमकला, वादळी खेळीने लक्ष वेधलं
