कोल्हापुरात तरण्याबांड लेकरांनी आयुष्य संपवण्याची मालिका संपता संपेना; आता माजी महापौरांच्या नातवाचा टोकाचा निर्णयानं सन्नाटा


Kolhapur News: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये धक्कादायक आत्महत्यांची मालिका सुरूच आहे. जिल्ह्यामध्ये मिसरूटही न फुटलेल्या तरण्याबांड मुलांपासून ते वयाच्या पस्तीशीतील आत्महत्यांची मालिका सुरूच असताना आता पुन्हा एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूरचे माजी महापौर ॲडव्होकेट महादेव आडगुळे यांचे नातव्याने वयाच्या 17व्या वर्षी आयुष्य संपवलं आहे. त्यामुळे कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रौनकने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. महादेवराव आडगुळे यांचे चिरंजीव इंद्रजीत आडगुळे यांचा रौनक हा मुलगा होता. त्याने रात्री 12 च्या सुमारास राहत्या घरीच आत्महत्या केली. जुना बुधवार पेठ परिसरातील राहत्या घरीच त्याने आत्महत्या केली.  त्याचा मृतदेह उत्तरी तपासणीसाठी शेंडा पार्कमध्ये नेण्यात आला आहे. अवघ्या 17 वर्षाच्या हसत्याखेळत्या मुलाने अशा पद्धतीने आयुष्य संपवल्याने कुटुंबामध्ये मित्र परिवारामध्येही सन्नाटा पसरला आहे. दरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रौनकने नुकतीच 12 वीची परीक्षा दिली होती. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.

अडीच वर्षांत तब्बल 1,872 जणांच्या आत्महत्या

दुसरीकडे,कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षांत तब्बल 1,872 जणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवल्याची धक्कादायक आकडेवारी पोलिसांच्या नोंदीवरून समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक 36 टक्के आत्महत्या या 19 ते 35 या तरुण वयोगटातील आहेत. गेल्या अडीच वर्षांत झालेल्या एकूण 1,872 आत्महत्यांमध्ये 1,555 पुरुष आणि 317 महिलांचा समावेश आहे. कुटुंबाच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी, वाढता मानसिक ताण आणि आर्थिक संकट यांमुळे महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये आत्महत्येचे प्रमाण जवळपास पाच पट जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्षनिहाय आकडेवारी पाहिल्यास, 2024 मध्ये 770 जणांनी (646 पुरुष, 124 महिला) तर 2025 मध्ये ही संख्या वाढून 800 (650 पुरुष, 150 महिला) झाली. चालू वर्ष म्हणजेच 2026 मध्ये अवघ्या साडेपाच महिन्यांत 302 जणांनी (259 पुरुष, 43 महिला) आपली जीवनयात्रा संपवली आहे. यावरून जिल्ह्यात आत्महत्येचे सत्र दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याचे दिसते.

जिल्ह्यात 19 ते 35 वयोगटातील तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 36 टक्के आहे. या वयोगटातील तरुण-तरुणींमध्ये स्पर्धा परीक्षांमधील अपयश, नोकरीची अनिश्चितता, लग्नाला होणारा उशीर आणि आर्थिक स्वावलंबनाचा वाढता ताण यामुळे नैराश्य येत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. ग्रामीण भागात शेतीच्या अनिश्चिततेमुळे तरुणांमध्ये हताशपणा वाढला असून, यातून निर्माण होणाऱ्या व्यसनाधीनतेमुळे अनेक तरुण मृत्यूला जवळ करत आहेत. चिंतेची बाब म्हणजे, शालेय वयाच्या मुलांमध्येही हे प्रमाण दिसून येत आहे. वडिलांनी मोबाईल दिला नाही, पालकांनी अभ्यासासाठी रागावणे, किंवा परीक्षेत कमी गुण मिळणे अशा कारणांमुळे अल्पवयीन मुलेही  टोकाचा निर्णय घेत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *