Archana Patil on Omraje Nimbalkar: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ज्यांच्याविरोधात लढल्या, त्याच खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आता महायुतीत स्वागत करत जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या प्रवेशामुळे महायुतीला फायदा होईल आणि भविष्यात त्यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या प्रचारासाठीही काम करू, असे त्या म्हणाल्या. याचवेळी छोटे छोटे जॅक टॉमी, बस मध्ये सीट मिळवून देणे म्हणजे विकास नसतो, लोक भावनिक झाले किंवा मी कमी पडले म्हणून लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मात्र आता विकासासाठी आले आहेत तर त्यांचा स्वागत अस पाटील म्हणाल्या.
सीबीआय हायकोर्टात गेली तरी आम्ही निर्दोष सूटू
ओमराजे निंबाळकर यांनी पाटील कुटुंबाशी संघर्ष सुरूच राहणार असल्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काय बोलायचे ते त्यांनी ठरवावे, आम्ही त्यावर भाष्य करणार नाही, असे अर्चना पाटील म्हणाल्या. तर पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने आणि जनतेने आम्हाला निर्दोष म्हटले असून डॉ. पद्मसिंह पाटील खुनी नाहीत, कोण जबाबदार आहे हे ठरवणे सीबीआय आणि पोलिस यंत्रणांचे काम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सीबीआय हायकोर्टात गेली तरी आम्ही निर्दोष सूटू असा विश्वास आहे त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
आम्ही जेव्हा पक्ष बदलला तेव्हा आम्हाला गद्दार म्हटलं गेलं
अर्चना पाटील म्हणाल्या की, आमच्यासाठी हा विषय म्हणजे वरच्या पक्षश्रेष्ठी ठरवतील मोदी साहेब दिल्लीतले किंवा राज्यातले महायुतीचे सगळे उमेदवार ठरवतील.जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल ज्या कुठल्या पक्षाचा आणि शिवसेनेला जागा सुटली तर ओमराजे असतील तर त्यांचा पण प्रचार आम्ही कसोशी करू. आम्हाला भाजपमध्ये शिकवलं जातं की पहिले राष्ट्र मग पक्ष आणि मग स्वतः तर राष्ट्रासाठी. जर राष्ट्रामध्ये काही आपल्याला नवीन विधेयक काढायचे असतील त्यांच्यासाठी जर यांचा उपयोग होणार असेल तर निश्चितच त्यांच स्वागत आहे. त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही जीव तोडून सांगत होतो की वरती दिल्लीत मोदीजींच सरकार येणार आहे तर त्याच पक्षाचा जर खासदार असेल तर आपल्या धाराशीव जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा येणार आहे. त्यांना हे पटलं की महायुतीत आल्यानंतरच धाराशिवचा विकास होऊ शकणार तर त्यांच स्वागत आहे. आम्ही जेव्हा पक्ष बदलला तेव्हा आम्हाला गद्दार वगैरे म्हटलं गेलं. आता त्यांनी सांगितलं की हा खरा विकास असतो.
ओमराजेंनी पाटील कुटुंबाचा प्रचार न करण्याच्या भूमिकेवर त्या म्हणाल्या की, त्यांची काय भूमिका आहे किंवा त्यांचे विचार काय याला माझं कंट्रोल नाही, पण आमचं निश्चित असेल की महायुती जो कोणी उमेदवार देईल आम्ही कसोशीने प्रयत्न करू. आम्हाला दिल्लीमध्ये मोदी साहेबांच सरकार आणायचं आहे भाजपच सरकार आणायचं आहे, त्यामुळे महायुती ज्याला जागा सोडेल आणि जो उमेदवार असेल त्याच्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करू.
कोणीतरी खूप बोंबीच्या देठापासन ओरडलं म्हणून
पवनराजे हत्या प्रकरण आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांची निर्दोष मुक्ततेवर त्या म्हणाल्या की, कोर्टाने डॉक्टर साहेबांना निर्दोष सिद्ध केलं आहे. आम्ही निर्दोष सुटले तरी आम्ही त्याचं भांडवल केलं नाही. जर आम्ही खून केलेलाच नाही तर आम्हाला न केलेल्या गुन्हाबद्दल फाशीला तर चढवणार नाही त्यामुळे आम्हाला कधीच भीती नाही. निकालावर राजकीय दबावाच्या आरोपावर त्या म्हणाल्या, तसं असतं तर आम्ही खूप पूर्वी भाजपमध्ये गेलो होतो. निकाल डॉक्टर साहेबांच्या बाजूने लागला कारण पुरावे नाही आणि आम्ही केलेलंच नाही. कोणीतरी खूप बोंबीच्या देठापासन ओरडलं म्हणून कोणी खुनी होत नसतो. त्याला पुरावे लागतात, असे त्या म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story