हर्षा भोगले यांनी त्यांच्या युट्युब चॅनलवर भारत आणि आयर्लंड यांच्यात होणाऱ्या टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाचं विश्लेषण केलं. ओपनर म्हणून भारताला वर्ल्ड कप जिंकवणारे संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माच राहतील, असं मत हर्षा भोगले यांनी व्यक्त केलं आहे. सध्या तुम्हाला वर्ल्ड चॅम्पियन ओपनरसोबतच राहिलं पाहिजे, त्यांना हटवून वैभवला संधी दिली गेली, तर ते चुकीचं ठरेल, असं हर्षा भोगले म्हणाले.
वैभव सूर्यवंशीला थोडी वाट पाहावी लागेल. संजू किंवा अभिषेक यांची कामगिरी खराब झाली तरच वैभवला संधी मिळेल, असं वक्तव्य हर्षा भोगले यांनी केलं.
हर्षा भोगलेंच्या टीममध्ये 6 लेफ्टी
हर्षा भोगले यांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंग यांना संधी दिली. तर स्पिन बॉलिंगची जबाबदारी वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांच्याकडे असेल. चौथा फास्ट बॉलर म्हणून शिवम दुबेचा पर्याय उपलब्ध आहे.
हर्षा भोगलेंची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग
आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीम
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, तिलक वर्मा, सुर्यांश शेडगे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव