Ketan Agrawal Case : केतनला मारण्याचा नाही तर गंभीर जखमी करण्याचा होता प्लॅन, सिया आणि चेतनमध्ये नेमकी काय झाली होती चर्चा? धक्कादायक माहिती समोर 


Ketan Agrawal Pune Lohagad Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. केतनला मारण्याचा नाही पण गंभीर जखमी करायचा पहिला प्लॅन होता, अशी माहिती समोर आली आहे. केतनला जखमी करण्यासाठी कोणाला सुपारी द्यायची याबद्दल सिया आणि चेतनमध्ये बातचीत झाली होती. केतनला मारहाण करणे किंवा त्याचा अपघात घडवून आणण्यासाठी दोन्ही आरोपींनी चर्चा केल्याची माहिती देखील समोर आली आहे. 

आपल्यावर संशय येणार नाही म्हणून अपघात, लुटणे आणि मारहाण अशा पर्यायांवर झाली होती चर्चा

अपघात घडवून आणून जखमी करण्यासाठी किंवा त्याला लुटण्यासाठी कुठली लोकं हे काम करू शकतील, याबद्दल सुद्धा सिया आणि चेतनने चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. आपल्यावर संशय येणार नाही म्हणून अपघात, लुटणे आणि मारहाण अशा पर्यायांवर झालं दोन्ही आरोपींमध्ये चर्चा झाली होती. विवाहपूर्वी बाली मध्ये होणाऱ्या प्री-वेडिंग रद्द व्हावे यासाठी देखील खटाटोप केला होता. 

राज्यासह संपूर्ण देशात चर्चेत असलेल्या पुणे जिल्ह्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात (Ketan Agrawal Pune Lohagad Case) दिवसागणिक नवे खुलासे होत आहे. एकीकडे या प्रकरणातील मुख्य संशयित सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Choudhari) यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली. तर दुसरीकडे धक्कादायक खुलासे होत आहेत. केतनला मारण्याचा नाही पण गंभीर जखमी करायचा पहिला प्लॅन होता, अशी माहिती समोर आली आहे. केतनला जखमी करण्यासाठी कोणाला सुपारी द्यायची याबद्दल सिया आणि चेतनमध्ये बातचीत झाली होती. केतनला मारहाण करणे किंवा त्याचा अपघात घडवून आणण्यासाठी दोन्ही आरोपींनी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. 

Ketan Agrawal news: केतन अगरवालच्या हत्येनंतरचा घटनाक्रम

– 18 जून केतन अगरवाल पाय घसरुन दरीत पडल्याचा बनाव
– दरीतून मृतदेह बाहे काढणाऱ्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडे ‘अशी’ घटना घडेल का? पोलिसांची विचारणा आणि पहिला संशय
– सर्व विधी पार पडल्यावर 21 जूनला कुटुंबीय लोहगडावर पोहचले. केतनचा पडून मृत्यू झाला नसल्याचा पोलिसांकडे दावा
– मग सिया सांत्वनासाठी केतनच्या घरी आली, तेंव्हा केतनची बहीण संजनाने सियावर प्रश्नांची सरबत्ती केली.
– लोहगडावर तुम्ही काय-काय केलं? कुठं-कुठं फोटो काढले? फोटो काढताना पाय नेमका कसा घसरला? तेंव्हा तू खरंच फोटो काढत होतीस का? असे एकणानेक प्रश्न विचारताचं ती अनुत्तरित झाली
– बहीण संजनाच्या प्रश्नांनी सियावर संशय वाढला.
– वडील आणि बहिणींनी उपस्थिती केलेली शंका, दिलेले जबाब यातून तपासाची चक्र वेगाने हलली.
– जबाबात चेतन चौधरीचं नाव आलं. सिया आणि चेतनचे सिडीआर तपासण्यात आले. 

– सिया आणि चेतनमध्ये गेल्या वर्षभरात 2004 वेळा फोन कॉल झाल्याचं आणि तीनशेहुन अधिक तास संवाद झाल्याचं उघड

– पण 18 जूनला तेजसचं लोकेशन लोहगडावर आढळलं नाही. 

– एक तरुण भर उन्हात हुडी, हेडफोन आणि मास्क घालून लोहगडाच्या सीसीटीव्हीत आढळला. 
– तोचं तरुण पुढं जाऊन सियाला काहीतरी खुनवत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं.
– हा तरुण चेतन असेल तर मग फोन लोकेशन मार्केटयार्ड का दाखवतोय? मग पोलिसांची 18 जूनला चेतनच्या फोनवर आलेल्या व्यक्तींकडे विचारणा.
– चेतनचा फोन दुकानातील कामगारने उचलल्याचे आणि कामगाराचा फोन घेऊन चेतन लोहगडावर आल्याचं स्पष्ट
– 22 जूनच्या रात्री पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तेजसला ताब्यात घेतलं.
– तेजसला पोलिसी खाक्या दाखवताच सियाचं ही बिंग फुटलं.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *