इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला 27 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे, टी-20 मालिकेनंतर भारतीय संघाने एकदिवसीय मालिकाही 1-2 ने गमावली. मात्र, लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि त्याने शानदार 138 धावा केल्या. आपल्या शतकादरम्यान रोहितने 17 चौकार आणि पाच षटकार मारले. रोहितचा लॉर्ड्सवरील सामना हा शेवटचा सामना असणार आहे असं म्हटले जात होते. हा सामना खेळून तो आपली निवृत्ती जाहीर केली अशी चर्चा ही रंगली होती. यामागे रोहितचा खराब फॉर्म जबाबदार असल्याचे समोर आले होते. पण सगळ चित्रच पलटलं. रोहितने तर मैदान गाजवलं, त्याने दमदार शतकी खेळी खेळली. आता या शतकानंतर त्याची रिॲक्शन आता व्हायरल होत आहे. रोहितचा असा अंदाज आधी कधीच पाहिला नसेल. रोहितच्या रिॲक्शनचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले दिसले.
रोहितच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू
रोहित शर्माने आदिल रशीदच्या गोलंदाजीवर चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. त्याला पाठिंबा देण्यासाठी त्याची पत्नी रितिकाही तिथे उपस्थित होती. जेव्हा रोहितने आपले शतक पूर्ण केले, तेव्हा संपूर्ण स्टेडियम उभे राहिले आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या. रितिकाही तिथे उपस्थित होती. रितिका डोळे पुसताना दिसली. शतक पूर्ण केल्यानंतर रितिकाच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि रोहितने मैदानाच्या मधून तिला फ्लाइंग किस दिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, रोहित शर्माने आपले शतक कोणत्याही विशेष पद्धतीने साजरे केले नाही. त्याच्या शतकाच्या वेळी भारतीय संघ लक्ष्यापासून खूप दूर होता. रोहितने शतक केले पण त्याचा काही विशेष फायदा झाला नाही.
This is the first time ig Rohit Sharma has given flying kiss to Ritika while batting. This innings was so emotional for him 😭❤️ pic.twitter.com/UG0HO4Eb0F
— Kusha Sharma (@Kushacritic) July 19, 2026
रोहितच्या अविस्मरणीय खेळीनेही भारतीय संघाला विजय मिळवून देता आला नाही. इंग्लंडने दिलेल्या 388 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला 7 गडी गमावून केवळ 360 धावाच करता आल्या. रोहित व्यतिरिक्त, शुभमन गिलने भारतासाठी 77 धावा केल्या, तर कोहलीने 60 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 74 धावा केल्या. सामना गमावण्यासोबतच भारतीय संघाने मालिकाही गमावली. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. इंग्लंडने दुसरा आणि तिसरा सामना जिंकला.