Delhi Protest : पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरून राहुल गांधींना उचललं, प्रियंका गांधींचा जोरदार प्रतिक्रार; काँग्रेसचे अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात


नवी दिल्ली : नीट पेपरफुटी आणि दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्ज प्रकरणी काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केलं. तीन तासांहून जास्त काळ राहुल गांधी आणि त्यांच्या खासदारांनी पंतप्रधानांच्या निवासस्थाबाहेर आंदोलन केलं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या खासदारांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. 

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकार संसदेत चर्चा करण्यासाठी तयार असल्याची माहिती आहे. मात्र केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीवर राहुल गांधी ठाम असल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरही राहुल गांधींनी त्यांचे पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरचं आंदोलन सुरूच ठेवलं. त्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापल्याचं दिसून आलं. 

पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरून काँग्रेसचे खासदार हटत नसल्याचं दिसताच दिल्ली पोलिसांनी कारवाई सुरू केली. सुरुवातीला त्यांनी काँग्रेसच्या खासदारांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर राहुल गांधी यांच्यासह प्रमुख नेत्यांनाही ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. 

प्रियंका गांधींचा जोरदार प्रतिकार

राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर महिला पोलिसांनी प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रतिक्रिया केल्याचं दिसून आलं. त्या आधी पोलिसांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनाही ताब्यात घेतलं. 

ही बातमी वाचा:





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *