Last Updated:
समोरून आलेल्या बाईकस्वाराचा जीव वाचवण्याच्या नादात कारचा अपघात होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मौलाना मोहम्मद नदीन, त्याची आई शमीमा बेगम आणि चार वर्षाची मुलगी अनाबिया तस्कीन अशी त्यांची नावे आहेत.
Nanded Accident News : नांदेड जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत समोरून आलेल्या बाईकस्वाराचा जीव वाचवण्याच्या नादात कारचा अपघात होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मौलाना मोहम्मद नदीन, त्याची आई शमीमा बेगम आणि चार वर्षाची मुलगी अनाबिया तस्कीन अशी त्यांची नावे आहेत. या मृतांसोबत काही जण गंभीररित्या जखमीही झाले आहेत. तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यात ही दुदैवी घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौलाना मोहम्मद नदीम हे अरबी शिक्षक असून नांदेड शहरातील बागबान कॉलनी मस्जिद कुबा गल्ली येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे.दरम्यान कुटुंबातील काही सदस्य उमराह रात्रेला गेले होते. यात्रा करून आज त्यांचे हैदराबाद येथे आगमन होणार होते. त्यांना आणण्यासाठी मौलाना मोहम्मद नदीम आई, मुलगी आणि भावांना घेऊन नांदेडहून कारने हैदराबादला रवाना झाले होते.
यावेळी सांगारेड्डी जिल्ह्यातील बचूपल्ली परिसरात अचानक एक बाईकस्वार कारसमोर आल्याने ब्रेक मारण्याच्या नादात कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार तीनवेळा पलटी होईन दुभाजकाला धडकली. या भीषण अपघातात आई,मुलगा आणि नात या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारमध्ये असलेला काही जण गंभीर जखमी आहेत. या जखमींना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तेलंगणातील संगारेड्डी येथे आज पहाटे ही घटना घडली होती.
दरम्यान मृत शमीमा बेगम या आंध्र महाराष्ट्र फ्रुट कंपनीचे अयूबभाई यांच्या वहिनी होत्या, तर मृत मौलाना मोहम्मद नदीम हे त्यांचे पुतणे आणि अनाबिया तस्कीन ही त्यांची नात होती.माय लेकासह नातीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.
Nanded,Maharashtra
Nanded : बाईकस्वाराचा जीव वाचवायला गेला अन् आक्रित घडलं, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, गाव हळहळलं
