नवी दिल्ली : नीट पेपरफुटी, सीजेपीच्या जंतर मंतर ते संसद भवन मोर्चातील लाठी हल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर तीन तास ठिय्या आंदोलन केलं. यावेळी सरकारकडून केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन उपस्थित होते. काँग्रेसच्या तीन तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांना ताब्यात घेतलं. या सर्व प्रकरणी जितेंद्र सिंह यांनी सरकारची भूमिका मांडली.
जितेंद्र सिंह काय म्हणाले?
काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहसचिवांसोबत गेलो होतो. तिथं पोहोचल्यावर राहुल गांधी यांनी केंद्र सरकार नीट आणि इतर विषयांवर चर्चेस तयार झाल्यास धरणे आंदोलन समाप्त करु असं सांगितलं. मी त्यांना दोनवेळा विचारलं. सरकार नीट संदर्भात चर्चेला तयार असल्याचं राहुल गांधी यांना सांगितलं. यानंतर राहुल गांधी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा पाहिजे, असं म्हटल्याचं जितेंद्र सिंह यांनी सांगितलं.
जितेंद्र सिंह म्हणाले की राहुल गांधी संसदेत काँग्रेस पार्टीला चर्चा करण्यास तयारी दाखवत असेल तर आंदोलन समाप्त करु असं सांगितलं होतं. तुम्ही आता गोलपोस्ट बदलत असल्याचं त्यांना सांगितलं असता त्यांनी माझी इच्छा असल्याचं राहुल गांधी म्हणाल्याचं जितेंद्र सिंह यांनी म्हटलं. सरकार चर्चेला तयार असल्याचं सांगताच राजीनामा हीच भूमिका असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं, तुम्ही आम्हाला इथून हटवू शकता, असं त्यांनी सांगितल्याचं जितेंद्र सिंह म्हणाले.
केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी राहुल गांधी यांना दुसरीकडे आंदोलन करण्यास सांगितलं असता तिथेच आंदोलन करणार असल्याचं सांगितलं. राहुल गांधी यांना सरकारसोबत जनहिताच्या मुद्यावर चर्चा करायची नसल्याचं जितेंद्र सिंह म्हणाले. या देशातील सर्वसामान्य व्यक्ती राजकीय नाटकबाजीमध्ये विश्वास ठेवत नाही, असं जितेंद्र सिंह म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच सांगितलं की स्पष्टपणे सांगितलं की नीट आणि पेपर लीक प्रकरणात जे जबाबदार लोक आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, कारवाई सुरु आहेत. या विषयामुळं सर्व देशावर परिणाम झाला आहे. आम्ही कोणावर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका मोदींनी घेतली आहे. देशातील जनता पाहतेय, जबाबदारी विरोधी पक्षनेत्यांची असेल, असं जितेंद्र सिंह म्हणाले.
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं