राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
मुंबई : राज्यातील एसआयआरचा पहिला गणना पत्र भरुन घेण्याचा टप्पा पूर्ण झाला आहे. यामध्ये दोन कोटी सात लाख (21.15 टक्के) मतदारांचे गणनापत्र जमाच झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. तर या एसआयआरच्या मोहिमेमध्ये जवळपास साडे सतरा लाख दुबार मतदार आढळून आले आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये चालु असलेल्या विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा (Special Intensive…