Bhabhi ji ghar par hai fame Shilpa shinde Fake MMS: टीव्ही अॅक्ट्रेस शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) सध्या ‘लॉक अप 2’ (Lock Up 2) मुळे चर्चेत आहे. तिनं या बहुचर्चित रिअॅलिटी शोमध्ये एन्ट्री केली आहे. काही महिन्यांपूर्वी तिनं एका निर्मात्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच तिनं आपल्या व्हायरल एमएमएसवर भाष्य केलं होतं. अलिकडेच तिनं या शोमध्ये वरुण यादव म्हणजेच लैलाला या घटनेबद्दल सांगितलं होतं. शिल्पाने सांगितलं की, तिला बदनाम करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात आला होता. शिल्पाने लैलाला नेमकं काय सांगितलं? जाणून घेऊयात.
शिल्पा शिंदेनं एमएमएस प्रकरणावर नेमकं काय सांगितलं? (Shilpa Shinde in lock up 2)
शिल्पा शिंदेनं सांगितलं की, ‘भाभीजी घर पर हैं. या बहुचर्चित शोमधून मला काढून टाकण्यात आलं होतं. त्यावेळेस खूप गोंधळ झाला होता. माझ्यामागे अनेक लोक लागले होते. माझ्याकडे इतर कोणताही मार्ग उरला नव्हता. एके दिवशी मला मीडियातील एका व्यक्तीने व्हिडीओ क्लिप पाठवला होता. मी विचारलं तिला हे नक्की काय आहे? तर ती म्हणाली, तुमचा व्हिडीओ आहे’.
‘तिनं मला सांगितलं होतं की, व्हिडीओ डाऊनलोड करुन बघ. व्हिडीओ समोर आल्यानंतर मला आधी वाटलं की, चेजिंग रुममधील व्हिडीओ असू शकतो. पण व्हिडीओत भलतंच होतं. माझं शरीर थंड पडलं. व्हिडीओ ब्लर होता. एक तरुणी तरुणाच्या अंगावर झोपली होती. मला शॉक बसला. हे काय आहे? ‘, असा प्रश्न शिल्पाने त्या व्यक्तीला विचारला. तेव्हा त्या व्यक्तीने, ‘तुमचा व्हिडीओ आहे’, असं सांगितलं.
तेव्हा शिल्प त्या व्यक्तीला ओरडली, ‘पागल आहेस का? बेडशीट बघ किती घाणेरडी आहे. मला ठाऊक आहे, मी शेवटी कधी रिलेशनशिपमध्ये होती. हे शक्य नाही. तिनं मला विचारलं की, व्हिडीओ रिलीज करु का? मी तिला रागावून म्हटलं की, याचा अर्थ काय? मला बदनाम करण्यासाठी पुरे पूर प्रयत्न करण्यात येत होता. मी त्या व्हिडीओच्या मुळाशी गेले. तो व्हिडीओ हिंदी पॉर्नमधील असल्याचं समोर आलं’, असं शिल्पा म्हणाली.
‘व्हायरल झालेला व्हिडीओ ब्लर होता. ‘भाभीजी का MMS’ असं म्हणत हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. माझ्या आईला देखील या व्हायरल व्हिडीओमुळे टोमणा ऐकावा लागला होता. या व्हिडीओमुळे मी खूप काही सोसलं आहे. खूप त्रास सहन करावा लागला आहे’, असं शिल्पाने सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
‘डॅडी’ अरुण गवळींच्या लेकीचं स्वप्न पूर्ण, राजकारण नाहीतर वकिलीत मारली बाजी, जावई कौतुक करत म्हणाला…