SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
SBI: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या एसबीआयच्या (SBI) ग्राहकांनी आजच (22 मे) आपली सर्व महत्त्वाची शाखा-संबंधित कामे पूर्ण करावीत. कारण एसबीआयच्या शाखा 23 ते 28 मे 2026 या काळात सलग सहा दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. यामागील मुख्य कारणे म्हणजे वीकेंड, प्रस्तावित दोन दिवसांचा कर्मचारी संप आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बकरीद (ईद-उल-अजहा)…