Petrol Diesel CNG price Hike: पेट्रोल-डिझेलनंतर आणखी एक झटका बसणार, दिल्लीत निर्णय झाला, मुंबईतही सीएनजीचे दर वाढणार?


Petrol Diesel CNG price Hike: देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रविवारी पुन्हा एकदा वाढ झाली. गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये तिसऱ्यांदा दरवाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल लिटरमागे 90 पैशांनी महाग होऊन 108.49 रुपयांवर पोहोचलं आहे. तर डिझेल (Diesel Price) लिटरमागे 94 पैशांनी महाग होऊन 95.02 रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल प्रतिलीटर चार रुपयांपेक्षा जास्त महागले आहे. यासोबत सीएनजीच्या दरातही (CNG Rate) वाढ होण्याची संकेत मिळत आहेत. तसे झाल्यास पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलपाठोपाठ सीएनजी वाहनधारकांनाही महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. दिल्लीत सीएनजीच्या दरात एका रुपयाने वाढ झाली आहे. दिल्लीत आता सीएनजीचा प्रतिकिलो दर 81.09 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. दिल्लीनंतर मुंबईतही सीएनजीचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Fuel Price)

यापूर्वी गेल्या आठवड्यात 15 मे आणि 19 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता तिसऱ्यांदा ही वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. काही दिवसांपूर्वीच  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण युद्धाचा उल्लेख करत, लोकांना पेट्रोल आणि डिझेलचा काटकसरीनं वापर करण्याचा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर लगेच इंधन दरवाढीचे सत्र सुरु झाले आहे.

Petrol Diesel price Hike: पेट्रोल-डिझेलच्या भावात तिसऱ्यांदा वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?

Mumbai Petrol and Diesel rates

पेट्रोल- 108.45
डिझेल-95.02

Parbhani Petrol and Diesel rates

पेट्रोल- 110.45 पैसे
डिझेल- 97.02

Kolhapur Petrol and Diesel rates

पेट्रोल- 109.30
डिझेल-  95.89

 Bhandara Petrol and Diesel rates

109.60 (पेट्रोल नवा दर)

96.18 (डिझेल नवा दर)

Solapur Petrol and Diesel rates

पेट्रोल- 109.14
डिझेल-  95.74

Amravati Petrol and Diesel rates

पेट्रोल- 109.15
डिझेल-  95.68

Washim Petrol and Diesel rates

पेट्रोल- 109.79
डिझेल-  96.39

Nashik Petrol and Diesel rates

पेट्रोल- 109.71
डिझेल-  96.26

Nagpur Petrol and Diesel rates

पेट्रोल- 108.97
डिझेल-  95.58

Ratnagiri Petrol and Diesel rates

पेट्रोल – 110.44
डिझेल – 97.01

Ahilyanagar Petrol and Diesel rates

पेट्रोल – 108.87
डिझेल – 95.47

Pune Petrol and Diesel rates

Petrol – 108.76
Diesal – 94.40

Akola Petrol and Diesel rates

पेट्रोल – 109.05
डिझेल – 95.63

Beed Petrol and Diesel rates

पेट्रोल – 110.38
डिझेल – 96.92

Chhatrapati Petrol and Diesel rates

पेट्रोल – 110.44
डिझेल – 97.10

Goa Petrol and Diesel rates

पेट्रोल- 102.13
डिझेल-  93.91

Raigad Petrol and Diesel rates

पेट्रोल- 109.72 
डिझेल-  96.25

Chandrapur Petrol and Diesel rates

पेट्रोल- 109.06
डिझेल-  95.68

Dhule Petrol and Diesel rates

पेट्रोल- 108.95 
डिझेल-  95.58

आणखी वाचा

Petrol Diesel Price Hike: महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, आता किती दर वाढले?

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *