अखेर गेम फिरला, शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का, ठाकरेंचे खासदार परत येणार? दिल्लीतून मोठी अपडेट! – Marathi News | Ubt party split two mp may return to uddhav thackeray party out of total six mp


UBT MP Revolt : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सहा खासदार फुटले आहेत. या बंडखोर खासदारांनी आता नवा गट स्थापन केल्याचे सांगितले जात आहे. लवकरच बंडखोर खासदारांचा हा नवा गट एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील हीच फूट लक्षात घेता ठाकरे यांच्या संसदीय पक्षाने व्हीप जारी केला आहे. आता ठाकरेंच्या सर्वच खासदारांना या व्हीपचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे नेमकं काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असतानाच आता मोठी माहिती समोर आली आहे. बंड केलेल्या एकूण सहा खासदारांपैकी एकूण 2 खासदार परत येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

ठाकरे यांच्या पक्षाकडून नेमकी काय खबरदारी घेतली जात आहे?

ठाकरे यांच्या पक्षाने व्हीप जारी केला आहे. या व्हीपनुसार ठाकरेंच्या संसदीय पक्षाची उद्या म्हणजेच 18 जून रोजी एक बैठक होणार आहे. या बैठकीला सर्वच खासदारांनी उपस्थित राहणे बंधनकारक ठरणार आहे. या बैठकीला किती खासदार येणार किती गैरहजर राहणार यावरून नेमके किती खासदारांनी बंड केले हे स्पष्ट होणार आहे. त्याआधी ठाकरे गटासाठी काहीशी दिलासादायक बाब म्हणजे सहा खासदारांपैकी दोन खासदार परत येण्याची शक्यता आहे.

दोन खासदार परत येणार?

सध्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत तीन खासदार आहेत. या तिन्ही खासदारांची नावे अनिल देसाई, विनायक राऊत आणि राजाभाव वाजे अशी आहेत. तर सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे. त्यातील दोन खासदार परत येण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरे यांच्या बैठकीला हजर राहू शकतात. सोबतच इशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हेदेखील या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

पत्रावर सही केलेली नाही

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते या दोन्ही खासदारांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती मिळत आहे. सोबतच या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना द्यावयाच्या पत्रावर सही केलेली नाही. त्यामुळे आता नेमकं का होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *