Sanchita Ugale Death Case: अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugale) हिच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली. अभिनेत्रीनं राहत्या घरात आयुष्य का संपवलं? असा सवाल उपस्थित सध्या सर्व स्तरातून होतोय. या प्रकरणात पोलीस तपासातून (Police case) काय उघड होईल? पोलिसांना आतापर्यंत कोणते धागेदोरे सापडले आहेत? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, संचिता उगलेच्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. संचिता उगलेच्या (Entertainment) आत्महत्या प्रकरणाचा तपास वेगाने व्हावा, यासाठी अखिल भारतीय चित्रपट कामगार संघटनाच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून विशेष विनंती केली आहे.
अखिल भारतीय चित्रपट कामगार संघटना (AICWA) अध्यक्षांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र (AICWA Demands SIT Probe Into TV Actress case)
अखिल भारतीय चित्रपट कामगार संघटना (AICWA)चे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिच्या मृत्यू प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे. सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, संचिता उगलेच्या मृत्यू प्रकरणात मोठी मागणी केली. त्यांनी या प्रकरणाचा तपास वेगाने व्हावा, यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
त्यांनी या पत्रातून संचिता उगले हिच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय, स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी, यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात यावी, अशी विनंती केली आहे. AICWAने या प्रकरणातील सत्य समोर यावे आणि सर्व संबंधित बाबींची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
संचिता उगलेनं आत्महत्या का केली? (Sanchita Ugale Death Case)
टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिनं 14 जून रोजी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. साडीच्या सहाय्याने गळफास लावून तिनं आयुष्य संपवलं. तिच्या आत्महत्येची बातमी समोर येताच, सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला. नातेवाईक किंवा इतर कलाकार मित्र मंडळींनी तिच्या विषयी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. गेल्या 6 महिन्यांपासून अभिनेत्री डिप्रेशनशी लढत होती, अशी माहिती आहे. दरम्यान, नेमकं खरं काय? हे अद्याप समोर आलेलं नाही. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष