सोलापूर : घरातून मुलासाठी डायपर आणण्यासाठी बाहेर पडलेल्या २४ वर्षीय तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह (Solapur Crime News) सापडल्याने खळबळ उडाली. सोलापुरातल्या विजापूर रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. सुफियान गुलाम रसूल शेख असं 24 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. सुफियान हा फॅब्रिकेशन काम करत होता. दीड वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता आणि त्याला एक लहान मुलगा आहे. काल (शुक्रवारी,ता २२) संध्याकाळी तो मुलासाठी डायपर आणतो असे सांगून घराबाहेर पडला. मात्र बराच वेळ तो घरी परतला नाही. विजापूर रोडपरिसरात असलेल्या पनाश अपार्टमेंटचे सुरक्षा रक्षक फेरफटका मारत असताना रात्री त्यांना एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात (Solapur Crime News) पडलेला दिसला. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनो तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी सुरु केली. त्यावेळी सुफियान घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याला फोन लावला. पोलिसांनी फोन उचलत घटनेची माहिती दिली. दरम्यान डायपर आणण्यासाठी निघालेला सुफियान विजापूर रोड परिसरात का गेला? त्याचा मृत्यू नेमकं कशामुळे झाला? त्याने आत्महत्या केलीय की त्याची हत्या झाली आहे? या सर्व प्रश्नांचा तपास सध्या पोलीस करत आहेत.(Solapur Crime News)
Solapur Crime News : नेमकं काय घडलं?
घरातून मुलासाठी डायपर आणतो असे सांगून घराच्याबाहेर पडलेल्या एका २४ वर्षीय फॅब्रिकेशन काम करणाऱ्या तरुणाचा सोलापुरातल्या विजापूर रोड परिसरात रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला. सुफियान गुलाम रसूल शेख (वय २४ वर्षे, नई जिंदगी) असे मृत तरुणाचे नाव आहे. काल (शुक्रवारी, ता २२) रात्री आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्या की घातपात? पोलिसांकडून सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.(Solapur Crime News)
मृत सुफियान शेख हा फॅब्रिकेशनचे काम करायचा. त्याचा दीड वर्षापूर्वीच विवाह झाला होता आणि त्याला एक लहान मुलगाही आहे. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास सुफियान आपल्या घरातून ‘मुलाचे डायपर’ आणण्यासाठी बाहेर पडला होता. मात्र, घरून निघाल्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांतच त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली.
शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास परिसरातील वॉचमन फेरफटका नेहमीप्रमाणे मारत असताना, त्याला तिथे एक तरुण पडलेला दिसला. त्याचे हात आणि पाय वाकडे होऊन तुटलेले होते, तसेच त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता.
Solapur Crime News : फोनची रिंग वाजली… अन् ओळख पटली
मिळालेल्या माहितीनुसार, खूप वेळ होऊनही सुफियान घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याला फोन करण्यास सुरुवात केली. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाजणारा फोन उचलला. त्यावेळी कुटुंबीयांनी ‘कितना देर हुआ कहाँ है तू?’ असा प्रश्न विचारला. पोलिसांनी घडलेली घटना घरातील सदस्यांना सांगितली.
आणखी वाचा