Salman Khan Latest Viral Video: सलमान खानचे (Salman Kha) अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होत असतात. बॉलिवूडचा भाईजान (Latest viral video) नेहमी ट्रेडिंगमध्ये असतो. अलिकडेच अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. या व्हिडीओतून त्याचा लेटेस्ट लूक पाहायला मिळत आहे. त्याचा हा लूक पाहून चाहत्यांना आनंद नाही तर, धक्का बसला आहे. शुक्रवारी सलमान खान मुंबईतील स्लम रिहाबिलिटेशन अथॉरिटी (SRA) यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गेला होता. या खास कार्यक्रमात त्याने Cream रंगाची शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. त्याच्या डोक्यावर टोपी देखील होती. त्याचा चेहरा आणि थकलेले डोळे पाहून सोशल मीडियावरील त्याच्या फॅन्सने चिंता व्यक्त केली आहे.
सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल, चाहते चिंतेत (Salman Khan latest video photo goes viral)
अलिकडेच सलमान खान स्लम रिहाबिलिटेशन अथॉरिटी येथील एका कार्यक्रमात उपस्थित होता. या ठिकाणी सलमान खानने अथॉरिटीचे नवे डेटा कलेक्शन आणि व्हेरिफिकेशन सपोर्ट सेंटरचे उद्घाटन केले. यावेळी सलमान खानने स्वत:च्या हाताने लाभार्थ्यांच्या घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या. या कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये 60 वर्षीय सलमान खान थकलेल्या अवस्थेत दिसत आहे. त्याचा हा अवतार पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
सलमान खान नेहमी आपल्या रुबाबदार बॉडी बिल्डींग स्टाइलने सर्वांना चकीत करतो. साठीतही सलमान खान हँडसम दिसतो, असं त्याचे बरेच चाहते म्हणतात. पण आज सलमान खानचा वेगळाच लूक समोर आला आहे. या कार्यक्रमात सलमान खानचे शरीर बारीक झालेले दिसत आहे. त्याच्या चाहत्यांनी कमेंट करुन सलमान खानच्या प्रकृती विषयी चिंता व्यक्त केली आहे. सलमानचा व्हायरल फोटो आणि व्हिडीओ पाहून एका चाहत्याने, ‘सलमान खान आजारी आहे. तो आता म्हातारा होत आहे’, अशी कमेंट केली आहे. तर, दुसऱ्या एका युझरने ‘हा सलमान खान नाही आहे. सलमान खानसारखा मास्क घातलेली कुणी दुसरीच व्यक्ती आहे’, अशी कमेंट केली आहे.
सध्या सलमान खान कोणत्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे? (Salman Khans Next Projects Information)
अलिकडेच सलमान खान ‘ राजा शिवाजी’ या सिनेमात झळकला होता. या सिनेमात त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. पुढील सिनेमात तो नयतारासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सलमानचा ‘मातृभूमी’ सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: