Abhinav Shuklas Podcast the4pointofview: रुबीना दिलैक (Rubina Dilaik) आणि अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) तसेच हिना खान (Hina Khan) आणि रॉकी जायसवाल या दोन्ही जोडप्यांनी मिळून स्वत:चा पॉडकास्ट ‘the4POV’ सुरु केला आहे. या पॉडकास्टमध्ये सोशल तसेच लाइफस्टाइलच्या निगडीत विषयांवर चर्चा केली जाते. नुकतंच रिलीज झालेल्या एका एपिसोडमध्ये या ग्रुपने दीया मिर्झाने वातावरण बदलाच्या विषयावर (Interview) भाष्य केलं होतं. दीयाने केलेल्या वक्तव्याचा काहींनी निषेध केला. हवामान संकटासाठी पुरुषसत्ता आणि पुरुष मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत, असं तिनं म्हटलं होतं. ग्रुपच्या या चर्चेदरम्यान, अभिनवने असं काही विधान केलं, ज्यामुळे अनेकांना धक्का बसला.
ग्लोबल वार्मिंगवर अभिनव शुक्ला नेमकं काय म्हणाला? (Abhinav Shukla On Global Warming)
या विषयावर आपले मत व्यक्त करताना अभिनव म्हणाला, ‘ग्लोबल वार्मिंगसाठी अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक मुख्य कारण म्हणजे पॉर्न बघणं…’ हीच गोष्ट त्याने सविस्तरपणे मांडली, अभिनव म्हणाला, ‘पॉर्न फिल्म तयार करण्यात आणि जगभरात याचे वितरण करण्यासाठी खूप ऊर्जा खर्च होते. याचे कार्बन फुटप्रिंटही खूप जास्त असते’, असं अभिनव म्हणाला होता. यानंतर अभिनवने असा युक्तिवाद केला की, पॉर्नोग्राफीचे पर्यावरणावरील परिणामांव्यतिरिक्त इतरही काही हानिकारक परिणाम आहेत.
यानंतर हिनाने अभिनवला, ‘तू पॉर्न पाहतोस का?’ असा प्रश्न विचारला. तेव्हा अभिनव उत्तर देत म्हटला, ‘पॉर्न धोकादायक आणि खतरनाक आहे. पॉर्न तुमच्या मनात वास्तवाबद्दल खूप अवास्तव अपेक्षा निर्माण करतात. पुरुषांसाठी ही गोष्ट त्यांना कमजोर करते. यामुळे तुम्ही तुमचा उद्देश गमावता. यात तुम्ही वेळ वाया घालवता.. तुम्ही तुमची ताकद वाया घालवता’, असं अभिनव म्हणाला. अभिनवचं ऐकून रुबीनाला शॉक बसला. हिना आणि रॉकी दोघेही अभिनवचं म्हणणं ऐकून हसतात.
चौघांच्या या चर्चेची क्लिप सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहे. सध्या त्यांच्या चर्चेचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम