बाळ होईना म्हणून दत्तक घेतलेला मुलगा; अनेक नवसांनंतर झाला सियाचा जन्म पण.., ‘त्या’ सवयीमुळे नातेवाईकही ठेवायचे अंतर | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

सियाच्या आई-वडिलांना लग्नानंतर अनेक वर्षे मूलबाळ होत नव्हते. आपल्याला कधी बाळ होणारच नाही, या भीतीने त्यांनी अखेर आपल्या भावाच्या मुलाला दत्तक घेतले होते.

अनेक नवसांनंतर झालेला सियाचा जन्म
अनेक नवसांनंतर झालेला सियाचा जन्म

पुणे: लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. घरच्यांनी केतनसोबत लग्न ठरवलं. मात्र, सियाच्या आयुष्यात आधीपासूनच चेतन होता. यानंतर या दोघांनी मिळून लोहगडाच्या कड्यावरून ढकलून केतनचा जीव घेतला. अतिशय शांत डोक्याने त्यांनी हा संपूर्ण डाव रचला. या प्रकरणाची मास्टरमाइंड आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिच्याबद्दल आता एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अत्यंत धार्मिक विचारांच्या आणि समाजात मोठा मान असलेल्या गोयल कुटुंबात अनेक नवसांनंतर सियाचा जन्म झाला होता. मात्र तिच्या एका वाईट सवयीने आज संपूर्ण कुटुंबाची मान झुकवली आहे.

अनेक वर्षांच्या नवसांनंतर झाला होता सियाचा जन्म

गोयल कुटुंबाशी दीर्घकाळापासून जोडल्या गेलेल्या सरस्वती गोयल यांनी सियाच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल अत्यंत थक्क करणारी माहिती दिली. सियाच्या आई-वडिलांना लग्नानंतर अनेक वर्षे मूलबाळ होत नव्हते. आपल्याला कधी बाळ होणारच नाही, या भीतीने त्यांनी अखेर आपल्या भावाच्या मुलाला दत्तक घेतले होते. मात्र, त्यानंतर अनेक मंदिरांमध्ये देवाकडे साकडं घातल्यानंतर आणि नवस मागितल्यानंतर सियाचा जन्म झाला. त्यामुळे ती संपूर्ण कुटुंबाची अतिशय लाडकी होती.

घरात धार्मिक कार्यक्रम, पण मुलगी निघाली क्रूर

सियाचे आई-वडील अत्यंत धार्मिक वृत्तीचे आहेत. ते समाजात नेहमीच विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. त्यांच्या घरात नेहमी श्रीमद्भगवद्गीतेचे पठण आणि अनेक धार्मिक विधी सातत्याने होत असायचे. अत्यंत सुसंस्कारी वातावरणात वाढूनही सिया मात्र गुन्हेगारीच्या अंधाऱ्या दुनियेकडे आकर्षित झाली. तिने तिच्यावर झालेल्या धार्मिक संस्कारांना तिलांजली देत थेट होणाऱ्या पतीच्या हत्येचाच कट रचला.

‘त्या’ सवयीमुळे नातेवाईकही ठेवायचे अंतर

समोर आलेल्या माहितीनुसार, सियाला नशेची अत्यंत भयंकर सवय जडली होती. ती नेहमी मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात आणि पार्ट्यांमध्ये बुडलेली असायची. तिच्या या नशेच्या सवयीमुळे तिचे स्वतःचे नातेवाईक आणि परिचयाचे लोक देखील घाबरायचे. सियाच्या संपर्कात येऊन आपली मुले बिघडू नयेत, म्हणून अनेक नातेवाईक आपल्या मुला-मुलींना सियाच्या मैत्रीपासून जाणीवपूर्वक लांब ठेवायचे.

अनेक नवस आणि प्रतिक्षेनंतर घरात आलेल्या या लाडक्या लेकीने अखेर आपल्याच हाताने स्वतःचे आयुष्य तर उद्ध्वस्त केलेच, पण आयुष्यभर समाजात मानानं जगणाऱ्या धार्मिक आई-वडिलांनाही कधीही न भरून निघणारा कलंक लावला आहे.

मराठी बातम्या/पुणे/

बाळ होईना म्हणून दत्तक घेतलेला मुलगा; अनेक नवसांनंतर झाला सियाचा जन्म पण.., ‘त्या’ सवयीमुळे नातेवाईकही ठेवायचे अंतर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *