कुठले खून? कुठले बॉम्ब? गँगस्टर बोलत नाही, असा खासदार बोलतोय; राज ठाकरेंचा संजय दिना पाटलांवर हल्लाबोल – Marathi News | MNS chief Raj Thackeray criticized MP Sanjay Dina Patil


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. मनसेचा मुंबईत पदाधिकारी मेळावा आहे. मेळाव्यात राज ठाकरेंकडून मार्गदर्शन करण्यात आले. यादरम्यान बोलताना राज ठाकरेंनी म्हटले की, निवडणुकांना समोर जात असताना जर आपल्याकडे तेवढी आयुध नसतील तर आपण काय करणार आहोत? आपल्याच मतदारांची नाव कापली जात असतील तर नंतर काय करणार आहोत आपण? जनगणना सुरू आहे अलर्ट रहा सतर्क रहा. ग्राउंडवर तुम्ही काम नाही केल तर भविष्यात काय करणार आहोत आपण. विभाग अध्यशांनो ढीमम् बसू नका फक्त.. उपविभाग अध्यक्ष आणि शाखाध्यक्षांवर तुमचा वचक नाहीये असे चालणार नाही.  आतापासूनच तयारीला लागा, काम करा. आजपासून या क्षणापासून कामाला लागा.  देशात भयंकर परिस्थिती सुरू आहे भाजपचे लोकही हैराण आहेत.

पुढे राज ठाकरे यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर निशाना साधत म्हटले की, एक खासदार बोलतो मी 5 खून केलेत बॉम्ब फोडीन. एखादा गँगस्टर बोलणार नाही असा पण लोकप्रतिनिधी बोलतो? कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही असे बोलूनही. कुठले खून केले ? कुठे बॉम्ब फोडले ? नाव न घेता त्यांनी संजय दिना पाटील यांच्यावर निशाना साधला.

राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, BLA रजिस्टेशन पुन्हा करावे लागणार आहे. मुंबई शहरात 3000 BLA हवे आहेत 900 आपले उमेदवार निवडून यावे असं वाटत असेल तर सगळ्यांनी काम करावे. आपण काम करायचं आणि तोंडावर पडायचं. आता जर फसलात तर पुढे काही उपयोग नाही. आज देशात काय राजकारण सुरू आहे पाहताय.

सत्तेमधीन पैसा, यातून फोडाफोडी हे सुरू आहे. देशात भयंकर स्थिती सुरू आहे , भाजप चे लोक सुद्धा हैराण आहेत.  जेव्हा हे सत्तेतून जातील तेव्हा आपल्याला तर आंनद होईल पण सगळ्यात जास्त आनंद हा भाजपमध्येच होईल. यादरम्यान जैन समाजाने राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि माफीनामा दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *