Krishna Cooperative Sugar Factory Election Result : महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत (Krishna Cooperative Sugar Factory Election) जयवंतराव भोसले सहकार पॅनलने विजयाची (Jayawantrao Bhosale Cooperative Panel won) ऐतिहासिक हॅट्रिक केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पाठिंबा दिलेल्या संस्थापक पॅनेलचा धुव्वा उडवला आहे. डॉ. सुरेश भोसले (Suresh Bhosale) व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले (ओूहतवोवो पदेोता) यांच्या नेतृत्वावर सभासदांकडून पुन्हा शिक्कामोर्तब झाला आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठी 50,000 सभासद संख्या असलेल्या कृष्णा करखान्याच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते.
ऐतिहासिक मताधिक्यानं जयवंतराव भोसले सहकार पॅनल विजयी
कृष्णा सहकारी साखर करखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. कृष्णा कारखान्याची निवडणूक अत्यंत चुरशीची होत असते. कारण सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कराड, वाळवा, कडेगाव व खानापूर असे 4 तालुक्याचे कार्यक्षेत्र आहे. या कारखाना कार्यक्षेत्र परिसरातून 5 आमदार निवडून येतात. त्यामुळं कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही अत्यंत महत्वाची मानली जाते. एवढ्या मोठ्या परिघातील या निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलने सलग तिसऱ्यांदा मिळविलेला हा विजय राज्यात ऐतिहासिक समजला जात आहे. कृष्णा कारखान्याच्या आजपर्यंतच्या कोणत्याही निवडणुकीत एवढी आघाडी कधीही मिळालेली नव्हती. एवढे भरघोस ऐतिहासिक मताधिक्य डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनलने मिळविले आहे.
अविनाश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालील संस्थापक पॅनेलला परभावचा धक्का
कराड तालुक्यातील रेठरे बुद्रूक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील जयवंतराव भोसले सरकार पॅनल व माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालील संस्थापक पॅनेल यामध्ये लढत झाली होती. कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी (ता. 21 जून) चुरशीने 82.26 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे सभासद विद्यमान सत्ताधारी पॅनेलला संधी देतात की विरोधकांच्या बाजूने कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज कृष्णा सहकारी साखर करखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. सत्ताधारी असणाऱ्या जयवंतराव भोसले सरकार पॅनलचा विजय झाला आहे. कृष्णा सहकारी साखर करखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर आज या निवडणुकीचा निकाल लागला आहे.
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story