Hee Dosti Tutaychi Nay Natak Raj Thackeray Sharmila Thakeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackerey) हे नेहमीच मराठी मनोरंजनसृष्टीतील वेगवेगळ्या प्रयोगांना, नाटकांना, चित्रपटांना हजेरी लावताना दिसतात. सध्या अभिनेता सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित यांच्या ‘ही दोस्ती तुटायची नाय’ नाटकाचा 50 व्या प्रयोगाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. यावेळी ‘धडाकेबाज ‘ चित्रपटातलं गाणं गात अभिनेता सुमित राघवनने शर्मिला ठाकरे यांच्यासोबत नाच केला. नंतर राज ठाकरेंचा हात शर्मिला ठाकरे यांच्या हातात देत तिघांनीही गाण्याचा बोलांवर ताल धरला. सुमित राघवन, चिन्मयी सुमित, शुंभकर आणि अमृता यांचा अभिनयाने नटलेल्या नाटकाचे रविवारी 50 वा प्रयोग पूर्ण झाले. या वेळी ही दोस्ती तुटायची गाण्यावर प्रेक्षकांसोबत शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ही सुमित राघवन यांचं कौतुक केलं.
सुमित राघवन- चिन्मयीच्या नाटकाला राज ठाकरेंची सपत्नीक भेट
50व्या प्रयोगाच्या खास निमित्ताने रंगमंचावर एक खास क्षण अनुभवायला मिळाला. राजदादा आणि शर्मिला यांनी ‘ही दोस्ती तुटायची नाय’ या गाण्याच्या तालावर ठेका धरत प्रेक्षकांची मनं जिंकली. मैत्री, आनंद आणि उत्साहाने भरलेला हा क्षण उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला. सुमित राघवनने सोशल मिडीयावर पोस्ट करत या क्षण चाहत्यांशीही शेअर केला.
खरंतर काही दिवसांपूर्वीच सुमित राघवन आणि चिन्मयी या दोघांनी या नाटकाच्या 50 व्या प्रयोगाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना निमंत्रण दिलं होतं. काही दिवसांपूर्वी दोघांनीही आवर्जून त्यांची भेट घेत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. यावेळी त्यांनी राज ठाकरेंशी पहिली भेट कशी झाली हेही या पोस्टमध्ये सांगितलेलं.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष