Zee Marathi SaReGaMaPa Announcement: ‘तोडलंस राणी तोडलंस’! TRP साठी होम मिनिस्टरनंतर झी मराठीचा हुकमी एक्का, अवधूत  गुप्तेने केली ‘सारेगमप’ची घोषणा 


Avdhut Gupte SaReGaMaPa Announcement: सध्या मराठी मनोरंजनविश्वात TRP च्या यादीत टिकून राहण्यासाठी वाहिन्या अनेक क्लुप्त्या काढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहने नव्याकोऱ्या 8 मालिकांची घोषणा केली होती. आता झी मराठीनेही (ZEE Marathi) TRP साठी नव्या मालिकांसह ज्या मालिकांमुळे, कार्यक्रमांमुळे वाहिनी पूर्वी प्रेक्षकांची खास पसंती बनली होती, त्या कलाकारांचा, मालिका झी मराठी परत आणत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेते आदेश बांदेकर यांच्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. पण आता प्रेक्षकांना सुरांच्या दुनियेत घेऊन जाणारं सरप्राइज मिळणार आहे. गायक संगीतकार आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी ‘सा रे ग म प’ कार्यक्रमाची घोषणा केलीय.त्यामुळे प्रेक्षकांमध्ये पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झालीय.

सा रे ग म प पुन्हा येणार!

झी मराठीवर आता ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमानंतर ‘सा रे ग म प’ कार्यक्रम पुन्हा सुरु होणार आहे.यासंदर्भात झी मराठी वाहिनीने त्यांच्या सोशल मिडीयावर एक प्रोमो शेअर केला आहे. यात अवधूत गुप्ते स्टुडीओमध्ये बसलेले दिसतायत. एक मुलगी गाणं गाताना दिसतेय. तिचं गाणं ऐकून अवधूत गुप्ते ‘ तोडलंस राणी तोडलंस’ म्हणताना दिसतोय. आंतरराष्ट्रीय संगीत दिवसाचं निमित्त साधत अवधूत गुप्ते यांनी ‘सा रे ग म प’ कार्यक्रमाची घोषणा केलीय.

अवधूत  गुप्ते यात म्हणताना दिसतात.  “गाणं ऐकलं की कसं बरं वाटतं. जागतिक संगीत दिनानिमित्त, घेऊन येत आहोत तुमचा, आमचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम ‘सा रे ग म प’ लवकरच आपल्या झी मराठीवर”.

‘महाराष्ट्राच्या घराघरात पुन्हा रंगणार सुरांची मैफल, कारण गाणं ऐकलं की बरं वाटतं..’ असं कॅप्शन लिहिलं आहे. महाराष्ट्रात या कार्यक्रमाने हजारो प्रेक्षकांची मने जिंकली. अनेक नवख्या गायकांना या कार्यक्रमाने उभं केलं. आर्या आंबेकर, रोहित राऊत,कार्तिकी गायकवाड यांसारख्या गायकांनाही या कार्यक्रमातून ओळख मिळाली. सध्या कार्यक्रमाचा फक्त प्रोमो समोर आला आहे. कार्यक्रमाची वेळ आणि तारिख अद्याप जाहीर झालेली नाही.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *