Petrol Diesel Price : पेट्रोल- डिझेलचे पुन्हा वाढणार भाव ? होर्मुजमधील टेन्शनने जगात धाकधूक ! कच्च्या तेलाच्या किमतीत परत उसळण – Marathi News | Crude Oil Prices Soar : Hormuz, Iran US Tensions Threaten Global Petrol and Diesel Hikes know Rates in India on 22 ndJune


कच्च्या तेलाच्या किमतींमुळ जगाचं वाढलं टेन्षन, भारतात इंधनाचे दर किती ?

सोमवारचा दिवस जगाचं टेन्शन वाढवणार ठरण्याची शक्यता आहे. कारण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ दिसून आली आहे. त्यामुळे जगाची धाकधूक वाढली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची तीन प्रमुख कारणं आहेत – पहिलं म्हणजे इराणकडून ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Hormuzची सामुद्रधुनी) बंद करणं; दुसरे, या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाजवाहतुकीचा वेग मंदावला; आणि तिसरं म्हणजे, शांतता कराराबाबत अमेरिका व इराणच्या अधिकाऱ्यांमधील बैठकीची झालेली कठीण सुरुवात. यामुळेच कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे; आखाती देशांमधील कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल 82 डॉलर्सच्या वर गेला, तर अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 78 डॉलर्सच्या पुढे गेल्या. परिणामी, केवळ भारतातच नव्हे तर जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता पुन्हा निर्माण झाली आहे. आज भारतातील प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या सध्याच्या किमतींवर एक नजर टाकूया..

कच्च्याा तेलाच्या किमतीत उसळण

सोमवारी ट्रेडिंगच्या सुरुवातीला 82.30डॉलर्सची उच्चांकी पातळी गाठल्यानंतर, ‘ब्रेंट क्रूड फ्युचर्स’ 54 सेंट्स किंवा 0.67 टक्क्यांनी वधारून 81.11 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. दरम्यान, सोमवारीच कराराची मुदत संपणार असताना, अमेरिकेच्या ‘वेस्ट टेक्सास इंटरमीजिएट’ (WTI) क्रूड फ्युचर्सचा भाव 2.02 डॉलर्स किंवा 2.64 टक्क्यांच्या वाढीसह78.62 डॉलर्स प्रति बॅरल इतका होता. ऑगस्ट महिन्यातील अधिक सक्रिय कराराचे (कॉन्ट्रॅक्ट) दर 1.43 डॉलरने वाढून प्रति बॅरल 77.28 डॉलरवर पोहोचले. सुट्टीमुळे शुक्रवारी अमेरिकन बाजारपेठेत व्यवहारांची अंतिम पूर्तता (सेटलमेंट) झाली नाही. रविवारी ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधून (होर्मुझची सामुद्रधुनी) जाणाऱ्या जहाजांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे जहाजवाहतुकीच्या आकडेवारीवरून दिसून आले. इस्रायल आणि अमेरिकेकडून तात्पुरत्या शांतता कराराचे उल्लंघन होत असल्याचे कारण देत, इराणने हा जलमार्ग पुन्हा बंद केल्याची घोषणा केल्यानंतर ही घटना घडली.

इराण- यूएस चर्चा

होर्मुजची सामुद्रधुनी (Strait) पुन्हा उघडण्याबाबतच्या बाजारातील अपेक्षा घाईघाईच्या होत्या असं ‘एमएसटी मार्की’ (MST Marquee) मधील ऊर्जा संशोधन विभागाचे प्रमुख सॉल कॅव्होनिक यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं इराण या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक विस्कळीत करण्यासाठी निमित्त शोधत राहण्याची शक्यता आहे; कारण हा त्यांच्याकडील एकमेव प्रभावी दबाव-उपाय (leverage) आहे आणि तो ते सहजासहजी सोडून देण्याची शक्यता नाही, असंही त्यानी नमूद केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर पुन्हा हल्ले करण्याची धमकी दिली, तर दुसरीकडे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी एका हंगामी शांतता करारांतर्गत चर्चेच्या पहिल्या फेरीसाठी रविवारी इराणी अधिकाऱ्यांची भेट घेतली. दरम्यान, लेबनॉनमधील संघर्ष थांबवण्याचे आश्वासन पाळण्यात अमेरिका अपयशी ठरल्याचे तेहरानने म्हटले आहे. लेबनॉनच्या ‘एनएनए’ (NNA) या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी लेबनॉनमध्ये झालेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये किमान 20 जण ठार झाले. अनेक महिन्यांपासून वाढलेला हिंसाचार थांबवण्याच्या उद्देशाने हिजबुल्लासोबत झालेली युद्धविरामAची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली.

पेट्रोल- डिझेल महागणार ?

मात्र कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे जगाची चिंता वाढली असून पेट्रोल- डिझेलचे भाव पुन्हा वाढणार का असा प्रश्न सर्वांना सतावत आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या तरी असे घडण्याची शक्यता कमी वाटते. त्यांनी नमूद केले की, कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल 80 ते 81 डॉलर्सच्या आसपास आहेत; जोपर्यंत हे भाव प्रति बॅरल 95 किंवा 100 डॉलर्सचा टप्पा ओलांडत नाहीत, तोपर्यंत अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी आहे.

भारतात पेट्रोल- डिझेलचे दर किती ?

सध्याच्या स्थितीनुसार, भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 102.12 आणि 95.20 रुपये प्रति लिटर इतकेच कायम आहेत. तर कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 113.51 रुपये आणि डिझेलचा दर प्रति लिटर 99.82 रुपये आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे प्रति लिटर 111.21 रुपये आणि 97.83 रुपये इतके आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 107.77 रुपयांवर पोहोचला आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 99.55 रुपये आहे. विशेष म्हणजे, मे महिन्यात इंधनाच्या दरांमध्ये 7 ते 8 टक्क्यांनी वाढ झाली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *