विधान परिषद निवडणुकीचे निकाल पुढे येत आहेत. नाशिकमधून धक्कादायक निकाल पुढे येत आहे. गिरीष महाजन आणि उदय सावंत यांनी गोकुळ गित्तेला माघार घेण्यासाठी दबाव टाकला होता. मात्र, अपक्ष ते निवडणुकीला उभे राहिले. त्यांनी कोणताही प्रचार केला नाही, अखेर गोकुळ गित्ते निवडून आले आहेत. हा भाजपाला मोठा धक्का आहे. विजयानंतर गोकुळ गित्ते यांनी सत्याचा विजय होतो, म्हणून प्रतिक्रिया दिली. आज 11 विधान परिषदेचे निकाल लागले आहेत. काही ठिकाणी महायुतीला यश मिळाले तर काही ठिकाणी मोठा धक्का बसला. भाजपचे राजेंद्र राऊत आघाडीवर आहेत. भाजप राजेंद्र राऊत यांना 107 मते तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वसंत देशमुख यांना 27 मते तर 16 मते वैध की अवैध याबाबत चर्चा सुरू आहे. जळगाव विधान परिषदेत निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन 577 मतांनी विजयी झाले.
नंदकिशोर महाजन यांच्या विजयाच्या घोषणाची औपचारिकता बाकी. धाराशिवमध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार
बसवराज पाटील आघाडीवर आहेत. नांदेड परिषद निवडणूक महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना 339 मत तर अमरनाथ राजूरकर यांना 255 मतांचे मताधिक्य. महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना 84 मत. वंचितचे उमेदवार प्रशांत इंगोले यांना 5 मतं मिळाली आहेत.
भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत भाजपचे अविनाश ब्राह्मणकर विजयी. अविनाश ब्राह्मणकर यांना 304 मतं…तर काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे असलेल्या नरेश ईश्वरकर यांना 152 मतं मिळाली…..457 पैकी एक मत अवैध ठरलं. औरंगाबाद जालना विधानपरिषद निवडणूक भाजपाचे सुहास शिरसाठ विजयी. सुहास शिरसाठ यांना 454 तर ठाकरे शिवसेनेचे गणेश लोखंडे यांना 134 मतदान
एकूण 630 पैकी नऊ मतदान ठरले अवैध. महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेवर संशय घेतला आहे. महायुतीच्या उमेदवाराकडे धनशक्ती होते आता कोणाचा विजय होतो ते पाहू, असे तायडे यांनी म्हटले. मनात धाकधूक नाही परंतु निवडणूक बिनविरोध झाले नाही आम्हाला हा आनंद आहे. मॅजिक पेन म्हणत पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेवर शरद तायडे यांनी संशय व्यक्त केला आहे. नागपूरमध्येही भाजपाचा उमेदवार विजयी झाला.सांगली सातारा विधान परिषद निवडणूक. भाजपचे धैर्यशील कदम यांना 591 मतांची पहिली पसंती. धैर्यशील कदम यांचा विजय निश्चित. राष्ट्रवादीच्या अभयसिंह जगताप यांनी 295 पहिल्या पसंतीची मते. 443 मतांचा आहे कोटा.. 9 मते ठरली अवैध.
महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांच्या विजयानंतर नांदेडात महायुतीचे कार्यकर्ते जल्लोष करतायेत. गुलालची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी सुरु आहे. अमरनाथ राजुकर यांचे चिरंजीव आशुतोष राजूरकर या जल्लोशात सहभागी झाले आहेत. धाराशिव महायुतीचे भाजपाचे उमेदवार बसवराज पाटील यांना 845 मतं तर 14 मते बाद. भाजपाचे बसवराज पाटील विजयी.
गोंदिया विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर हे विजयी झालेत…. त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे असलेल्या नरेश ईश्वरकर यांचा 148 मतांनी पराभव केला…. भाजपच्या उमेदवाराचा विजय जल्लोष मतदान केंद्राबाहेर बघायला मिळत आहे..