तुझ्या क्षुद्र बुद्धीला हे कळत नसेल..; इस्लामविरोधी टिप्पणीवरून संतापले जावेद अख्तर – Marathi News | Javed Akhtar shuts troll targetting him with Islamophobic comment reminds he is an atheist My qaum are all Indians


ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर हे विविध विषयांवर बेधडकपणे त्यांची मतं मांडत असतात. अनेकदा त्यांना यामुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र अशा ट्रोलर्सनाही रोखठोक उत्तर देण्यापासून ते मागे हटत नाहीत. नुकतीच त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्याकडे फोटोसाठी केलेल्या विनंतीवर एक टिप्पणी केली होती. मात्र जेव्हा एका नेटकऱ्याने जावेद अख्तर यांच्या धर्मावरून टीका केली, तेव्हा त्यांनी आपण ‘नास्तिक’ असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट करत संबंधित युजरचं तोंड बंद केलं.

शनिवारी अख्तर यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलं होतं, ‘दिवसेंदिवस खोटं बोलण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या खोटेपणाच्या कधीही न संपणाऱ्या यादीत आणखी एकाची भर घातली आहे. ते म्हणतात की मेलोनी यांनी त्यांच्याकडे फोटो काढण्यासाठी विनंती केली. सर्वप्रथम इटलीसारख्या महान देशाच्या पंतप्रधान, ज्या देशाने ट्रम्प यांच्या देशाला संस्कृती, कला, वास्तुकला आणि उत्कृष्ट चित्रपटांबद्दल खूप काही शिकवलं आहे, एक आत्मविश्वासू, अत्यंत प्रतिष्ठित, लोकप्रिय आणि शक्तिशाली महिला या जगातील सर्वांत अलोकप्रिय व्यक्तीसोबत फोटो काढण्याची विनंती का करतील? फक्त चर्चेसाठी समजा की हे खरोखरच घडलं असेल, तर विचार करा की कोणत्या प्रकारचा नीच, असभ्य आणि असंस्कृत माणूस पत्रकार परिषद असा दावा करेल?’

जावेद अख्तर यांचं ट्विट-

जावेद अख्तर यांनी त्यांच्या या पोस्टमधून जरी ट्रम्प यांच्यावर टीका केली असली तरी सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने या पोस्टवरून अख्तर यांनाच ट्रोल केलं. ‘सर, तुमच्या समुदायाच्या खोटेपणासाठीही माझ्याकडे एक शेर आहे.. जानते है हम जन्नत के हुरों की हकीकत, दिल के बहलाने के लिए ये खयाल भी अच्छा है (स्वर्गातल्या हुरांचं सत्य आम्हाला माहीत आहे, मनाचं समाधान करण्यासाठी हा विचारसुद्धा चांगला आहे)’, अशी खोचक टीका संबंधित युजरने केली. यावर अख्तरसुद्धा शांत बसले नाहीत. त्यांनी संबंधित युजरवर पलटवार केला.

जावेद अख्तर यांनी त्या ट्रोलरला सडेतोड उत्तर देत लिहिलं, ‘तुझ्या लहान, क्षुद्र आणि अविकसित बुद्धीला हे समजत नसेल की हे एक सर्वश्रुत सत्य आहे की मी नास्तिक आहे (कदाचित तू या शब्दाशी परिचित नसशील, याचा अर्थ असा होतो की जो कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही.) त्यामुळे मला माझ्या ‘कौम’बद्दल (समाजाबद्दल) सांगू नकोस. माझा कौम म्हणजे सर्व भारतीय आहे, त्यात तुझाही समावेश आहे.’ सोशल मीडियावर त्यांच्या या उत्तराची जोरदार चर्चा सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *