Last Updated:
फोटोमध्ये दिसणाऱ्या या चिमुकल्या मुलीला ओळखलं का? आज आहे सोशल मीडिया स्टार.
सोशल मीडियावर दररोज अनेक सेलिब्रेटी आपले फोटो शेअर करत असतात. कलाकारांचे बालपणीचे फोटो देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. सध्या एका चिमुकल्या मुलीचा फोटो समोर आला आहे. हा फोटो फारच क्यूट आहे. फोटोमध्ये दिसणारी चिमुकली मुलगी कोण आहे? तुम्ही ओळखलं का?
कलरफुल ड्रेस, छोटे केस, कपाळावर काळा टिका लावलेली ही चिमुकली खूपच गोड दिसतेय. तिच्या फोटोवरून अनेकांची नजर हलत नाहीये. ही चिमुकली आता सोशल मिडिया गाजवतेय. आज तिला लाखो लोक फॉलो करतात. पण तिच्या फेमस प्रसिद्ध मिळवण्यासाठीचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
फोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली वयाच्या 16 व्या वर्षी प्रेमात पडली होती. आंधळ्या प्रेमापोटी तिनं वयाच्या 18 व्या वर्षी घर सोडलं. प्रेम असलेल्या मुलाच्या घरी गेली त्यानंतर मात्र तिला वास्तवाची जाणीव झाली. ती घरी परतली. त्यानंतर तिनं स्वप्नांचा ध्यास घेतला आणि आपली ओळख निर्माण केली. आज ती सोशल मीडियावरची लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आहे.
फोटोमध्ये दिसणारी ही छोटी चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर आहे. अंकिताने नुकताच तिच्या सोशल मीडियावर तिचा बालपणीचा क्यूट फोटो शेअर केला आहे. या फोटोसह तिनं इमोशनल पोस्टही शेअर केली आहे.
अंकिताने पोस्टमध्ये लिहिलंय, “या फोटोतली ही छोटी मुलगी काहीच मागत नव्हती… फक्त थोडं प्रेम, थोडी साथ आणि मोठी स्वप्नं बघायची मोकळीक. आज तिची बरीच स्वप्नं पूर्ण झाली आहेत. पण गंमत अशी की स्वप्नं पूर्ण झाली की नवीन स्वप्नं जन्माला येतात. धावपळ संपत नाही.”
“कधी कधी वाटतं, त्या लहान मुलीला मिठी मारावी आणि सांगावं, “तू काळजी करू नकोस. तुझ्यावर अन्याय होईल, लोक गैरसमज करतील, खूप संघर्ष करावा लागेल… पण एक दिवस तू स्वतःचं जग उभं करशील.” आज तिच्याकडे पाहताना डोळे ओले होतात, कारण तिने जे सहन केलं ते त्या वयात कोणालाच सहन करावं लागू नये. आणि तरीही… ती हसत राहिली. लढत राहिली. आणि जिंकत राहिली. कधी कधी यश साजरं करण्यापेक्षा, ते मिळवण्यासाठी झगडलेल्या आपल्या जुन्या रूपाचं आभार मानणं जास्त महत्त्वाचं असतं. आज मी नेमकं तेच करतेय.”
अंकिता वालावलकर कोकणातील आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धीनंतर ती बिग बॉस मराठी 5 मध्ये सहभागी झाली होती. तिथे ती फिनालेपर्यंत पोहोचली. त्यानंतर अंकिता काही दिवसांआधी कानच्या रेड कार्पेटवर दिसली होती. कानच्या रेड कार्पेटवर जाणारा अंकिताही भारतातील पहिली मराठी सोशल मीडिया स्टार आहे.
Mumbai,Maharashtra
Guess Who : वयाच्या 18 व्या वर्षी घरातून पळून गेली, 30व्या वर्षी केलं लग्न; आता गाजवतेय सोशल मीडिया; ही चिमुकली कोण?
