Last Updated:
Samantha Ruth Prabhu Pregnant : नॅशनल क्रश समांथा रूथ प्रभू लवकरच आई होणार अशी माहिती समोर आली आहे. लग्नाच्या सहा महिन्यात खरंच समांथाकडे गुड न्यूज आहे? व्हिडीओ होतोय व्हायरल.
मनोरंजन विश्वात सध्या अनेक अभिनेत्री आई झाल्या आहेत. कलाकारांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. अशातच नॅशनल क्रश समांथा रूथ प्रभू हिच्याकडेही आनंदाची बातमी असल्याचं समोर आलं आहे. समांथाने 1 डिसेंबर 2025 रोजी दिग्दर्शक राज निदिमोरू याच्याशी दुसरं लग्न केलं. कोयंबटूर येथील ईशा योग केंद्र येथे लिंग भैरव मंदिरात त्यांनी गुपचूप लग्न केलं होतं.
गुपचूप लग्नानंतर राज आणि समांथा आई-बाबा होणार आहेत. लग्नाच्या 6 महिन्यातच समांथा आई होणार आहे. ही बातमी चाहत्यांपासून लपून राहिली नाही. समांथाचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तिचा क्यूट बेबी बंप दिसत आहे. या व्हिडीओवरून नेटकरी आणि चाहत्यांनी समांथा प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावला आहे. समांथाने मात्र याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
समांथा आणि राज लग्नानंतर सहा महिन्यांनी एकत्र दिसले. समांथाचा मा इंती बंगारम हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. सिनेमाला रिलीजनंतर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सिनेमाच्या सक्सेस नंतर समांथाने तिच्या टीमसोबत सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनमध्ये ती नवरा राजबरोबर दिसली. यावेळी समांथा प्रेग्नंट असल्याचं समोर आलं आहे.
व्हिडीओमध्ये समांथा व्हाइट टॉप आणि जीन्समध्ये दिसतेय. व्हाइट टॉपमध्ये समांथाचा बेबी बंप स्पष्टपणे दिसतोय. तिचा चेहरा देखील बदलल्याचं दिसतंय. चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो दिसतोय. समांथाच्या प्रेग्नंसीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दुसऱ्या लग्नानंतर समांथाचं आयुष्य आनंदात सुरू आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं.
समांथा आणि राज यांचं दुसरं लग्न आहे. समांथाचं पहिलं लग्न अभिनेता नागा चैतन्याबरोबर झालं होतं. पण काही वर्षात त्यांचा डिवोर्स झाला. त्यानंतर नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालाबरोबर दुसरं लग्न केलं. त्यानंतर लगेचच काही महिन्यात समांथा आणि राज यांनीही गुपचूप लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला त्यांचे कुटुंब आणि अत्यंत जवळचे मित्र मैत्रिणी उपस्थित होते.
Mumbai,Maharashtra
नॅशनल क्रश समांथाकडे Good News! दुसऱ्या लग्नाच्या 6 महिन्यांनी प्रेग्नंट? VIDEO मधे दिसला बेबी बंप
