Nagpur Vidhan Parishad Election 2026: नागपुरात मविआला धक्का! शरद पवार गटाचे नगरसेवक ‘नॉट रिचेबल’; हिंगणा नगरपंचायतमधील ‘ते’ 6 नगरसेवक नेमके आहेत कुठे?


नागपूर : नागपूरच्या हिंगणा नगरपंचायतमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सहा नगरसेवक नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. सहाही नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्याची कुजबुज नागपुरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नागपूर विधानपरिषदेमध्ये (Nagpur Vidhan Parishad Election 2026) महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढत असून अतुल लोंढे हे अधिकृत उमेदवार आहे. तर भाजपकडून राजीव पोतदार मैदानात आहे. नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे 19 नगरसेवक मतदार आहे. त्यात हिंगण्याचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Nagpur Vidhan Parishad Election 2026)

विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर भाजपचे डॉ. राजीव पोतदार व काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत होणार आहे. महानगरपालिकेत भाजपचे (Vidhan Parishad Election 2026 BJP) संख्याबळ जास्त असले, तरी काँग्रेसच्या नेत्यांनी क्रॉसव्होटिंग होईल, असा दावा केला. या निवडणुकीत कुठल्याही पद्धतीने भाजपचे संख्याबळ कमी दिसायला नको व नगरसेवक एकसंघ राहावे, यासाठी भाजप पक्षाकडून विशेष पावले उचलण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळेच मतदानापर्यंत नगरसेवकांना नागपूरच्या रणधुमाळीपासून दूर ठेवण्यात येणार आहे. त्यांना अगोदर मुंबईत नियोजित अभ्यासवर्गाला नेण्यात आलं आहे. (Vidhan Parishad Election 2026 BJP)

विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Vidhan Parishad Election 2026)

निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
अर्ज माघारीची मुदत- 4 जून 
मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
मतमोजणी- 22 जून 

कोण आलं बिनविरोध?

ठाणे – रवींद्र फाटक – शिवसेना (शिंदे)

रायगडरत्नागिरीसिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे – अजितदादा गट

पुणे – विक्रम काकडे – अजितदादा गट

वर्धागडचिरोलीचंद्रपूर – अरुण लखाणी – भाजप

यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी – शिवसेना (शिंदे)

अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे – भाजप

विधान परिषदेची (Vidhan Parishad) एकूण सदस्यसंख्या 78 आहे. विधान परिषदेत सदस्य कसे निवडले जातात? (Vidhan Parishad )

78 सदस्यांपैकी:

30 – आमदारांकडून निवडले जातात
22- स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून
7- पदवीधर मतदारसंघातून
7-  शिक्षक मतदारसंघातून
12- राज्यपाल नियुक्त करतात.

विधानसभेत कोणाचे संख्याबळ किती? (Maharashtra BJP Shivsena NCP Congress MLA)

भाजपा- 132 – 1 = 131
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 – 1 = 40
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जनसुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 (राजेंद्र यड्रावकर)
अपक्ष- 2 (शिवाजी पाटील आणि शरद सोनावणे)
       
महायुती = 131 + 57 + 40 + 2 + 1+1 + 2= 234 (2 आमदारांचं निधन)
मविआ = 16+10+20+2+1 = 49
इतर = 03 
एकूण = 286 आमदार
 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *