Pudhcha Paaul Fame Sangram Samel on Engagement: ‘पुढचं पाऊल’ (Pudhcha Paaul)मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे संग्राम समेळ (Sangram Samel). त्यानं अनेक मालिकांमधून आपली छाप सोडली. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मालिकांमध्ये काम केलं (Marathi Actor). त्याला विशेष ओळख ‘जय जय शिव शंकर’ या मालिकेतून मिळाली. या मालिकेत त्यानं शंकर महाराज यांची भूमिका साकारली होती. त्यानं आपल्या भूमिकेत जीव ओतून काम केलं होतं (Entertainment). त्याला विशेष ओळख या मालिकेत साकारलेल्या मुख्य पात्रामुळे मिळाली. संग्राम केवळ प्रोफेशनल नाही तर, पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असतो. अलिकडेच त्यानं आपला पहिला साखरपुडा कसा मोडला याबाबत सांगितलं.
तुटलेल्या साखरपुड्याबद्दल संग्राम समेळ नेमकं काय म्हणाला? (Sangram Samel on Broken Engagement)
अलिकडेच संग्रामने ‘कलाकार’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत संग्राम म्हणाला, ‘2014 साली ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत काम करत असताना मला मालिकेतील सहकाऱ्यांनी जपलं. हर्षदा आणि मृणाल ताईंनी, आपलं युनिट आपली फॅमिली असते, असं त्यांनी मला सांगितलं होतं. 2014 साली माझा साखरपुडा मोडला होता. 15 वर्षांचं माझं रिलेशनशिप होतं. फोनवर सगळं झालं होतं. मुलगी आणि तिचे नातेवाईक देणी घेणी परत घेण्यासाठी माझ्या घरी येणार होते. सगळं संपवण्यासाठी ते घरी येणार होते’.
‘तेव्हा माझं शूट होतं. मी त्यादिवशी सुट्टी नाही टाकली. सगळं संपत आहे, तर मी घरी बसून काय करु, असा विचार केला होता. तेव्हा मी शूटला गेलो. त्या काळी मला सर्वात जास्त डान्सची भीती होती. माझ्यात ताल नाही असं वाटायचं. पण आता माझी बायको डान्सर असल्यामुळे ती भीती आणि गैरसमज तिने माझ्यातून डोक्यातून काढून टाकला. डान्स करायचं म्हटलं की माझे हात – पाय गार व्हायचे. त्या दिवशी मालिकेत डान्स सिक्वेन्स होता, आणि घरात साखरपुडा मोडायला फॅमिली येणार होती’.
‘तेव्हा माझ्या डोक्यात डान्स चांगला करायचा आहे, असं होतं. पण बॅक ऑफ द माईंड वेगळा स्ट्रेस होता. मालिकेतील माणसं माझ्याबरोबर होती. माझी फॅमिली माझ्यासोबत होती. सगळे प्रोत्साहन करत होते. सगळे चिअर करत होते. तो दिवस पार पडला. तो दिवस लक्षात राहिल’, असं संग्राम समेळ मुलाखतीत म्हणाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव