बागेश्वर धामचे प्रमुख पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे बंधू शालिग्राम गर्ग पुन्हा एकदा वादात सापडले आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील राजनगर पोलिस ठाण्यच्या हद्दीतील गाव कोडा येथे त्यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या एका घटनेत जखमी शेतकरी मोतीलाल कुशवाह यांनी आरोप लावला आहे की पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्री यांचा भाऊ शालिग्राम गर्ग यांनी त्यांच्यावर गोळी झाडली. मोतीलाल यांचे म्हणणे आहे की जमीनीच्या वादातून आपल्यावर गोळीबार करण्यात आला आहे.
जमीनीच्या वादात फायरिंग
शालिग्राम गर्ग यांनी आपल्या साथीदारांसोबत मिळून कोणा गाव निवासी मोतीलाल कुशवाहावर फायरिंग केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेत मोतीलाल कुशवाहा गंभीर रुपाने जखमी झाले आहे. गोळ्या मोतीलाश कुशवाहा याच्या डोक्याला आणि कानाला स्पर्श करुन गेली. एक गोळी त्यांच्या शरीरात अडकल्याचे म्हटले जात आहे. मात्र, हॉस्पिटलच्या वतीने अजूनही मेडिकल रिपोर्ट समोर आलेला नाही.
साथीदाराच्या मदतीने हल्ला
जखमी मोतीलाल कुशवाहा याच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात घेऊन पोहचले, त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमी व्यक्तीचे नाजूक बनली आहे. जखमी भावाने आरोप केला आहे की शालिग्राम गर्ग आपल्यासोबत अनेक साथीदार घटनास्थळी पोहचले आणि अचानक हल्ला केला. हल्ल्यात मोतीला गंभीर रुपाने जखमी झाले आहे.
जखमी व्यक्तीचे जबाबाचा व्हिडीओ व्हायरल
घटनेचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्हिडीओत जखमी शेतकरी मोतीलाल कुशवाहा यांनी त्याची कैफियत मांडली आहे. यात त्याने त्याचे नाव मोतीलाल कुशवाहा असल्याचे म्हटले आहे. धीरेंद्र महाराज यांचे भाऊ शालिग्राम गर्ग यांनी आपल्यावर गोळीबार केल्याचा आरोप कुशवाहा यांनी केली आहे.मी जमीन सोडवण्यासाठी काही लोकांसोबत गेलो होतो. यावर शालिग्राम गर्ग संतप्त झाले आणि म्हणाले या लोकांसोबत का आलास.
गोळीबार केला आणि पळून गेले
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये, जखमी शेतकरी असे म्हणताना दिसत आहे की, त्या लोकांनी गोळीबार करून पळ काढला आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, काही लोक जखमी शेतकऱ्याला स्ट्रेचरवर रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहेत. आणखी एका व्हिडिओमध्ये, जखमी शेतकरी बेशुद्ध अवस्थेत दिसत आहे. रुग्णालयात पोलीसदेखील जखमी शेतकऱ्यासोबत दिसत आहेत.
जमीन बळकावण्याच्या प्रयत्नाचे आरोप
या घटनेमागे जमिनीचा वाद असल्याचे म्हटले जात आहे. मोतीलाल कुशवाहा यांचा आरोप आहे की, शालिग्राम गर्ग यांना गावातील एका ब्राह्मण कुटुंबाच्या जमिनीवर अतिक्रमण करायचे आहे. त्या कुटुंबाने प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती आणि अर्ज सादर करण्यासाठी मोतीलाल त्यांच्यासोबत गेले होते. यामुळे संतप्त झालेल्या शालिग्राम गर्ग यांनी आपल्या साथीदारांसह ही घटना घडवून आणल्याचा आरोप केला जात आहे.