Saee Tamhankar on Maharashtrachi Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या खुर्चीसाठी मी पझेसिव्ह; सई ताम्हणकरनं सांगितलं कारण, म्हणाली..


Saee Tamhankar on Maharashtrachi Hasyajatra: अभिनेत्री सई ताम्हणकर (Saee Tamhankar) मराठी मनोरंजनसृष्टीतील हरहुन्नरी नटी आहे. ‘तुंबाडची मंजुळा’या चित्रपटानंतर तिच्या ‘बोल बोल राणी’ या सिनेमातून पुन्हा एका नव्या भूमिकेत ती दिसणार आहे. तिच्या नव्या सिनेमाच्या ट्रेलरची सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या सई ताम्हणकर अनेक ठिकाणी मुलाखती देताना दिसते आहे. गेल्या काही वर्षांत सई ताम्हणकरने मराठीसह हिंदीतही अनेक प्रोजेक्ट केले. ‘भक्षक’ ‘मटका किंग’ ,मिमी या चित्रपटांमध्ये ही ती दिसली. शिवाय ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोची परीक्षकही आहे.  इतक्या वेगवेगळ्या प्रकारची काम करत असताना हास्यजत्रेत ती आवर्जून उपस्थित असते. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोची खुर्ची कशामुळे इतकी प्रिय आहे याचे उत्तर तिने दिलंय. तिच्या या उत्तराची सध्या मनोरंजन सृष्टीत चर्चा रंगली आहे. मुंटाला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.

सई ताम्हणकर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘ या लोकप्रिय शोचा अगदी पहिल्यापासून भाग आहे.तिच्यासोबत प्रसाद ओकही परीक्षकाच्या खुर्चीत असतो. हास्य जत्रेच्या प्रहसनांवर सई आणि प्रसाद दोघांचाही कमेंट्स कडे प्रेक्षकांचं कायम लक्ष असतं.कितीही व्यस्त शेड्युल असलं तरी हास्य जत्रेच्या शूटसाठी सही कायम असते. 

‘मी हास्यजत्रेच्या खुर्चीसाठी पझेसिव्ह’

मुंटाला दिलेल्या मुलाखतीत सई म्हणाली ‘महाराष्ट्राची हास्य जत्रेतल्या त्या खुर्चीसाठी मी पझेसिव्ह आहे.त्या खुर्चीवर एक दोन भाग सोडले तर इतर कोणीच बसू शकत नाही, इतकी मी त्यासाठी पझेसिव्ह आहे. एक कलाकार म्हणून माझी प्रतिमा आणि मी माणूस म्हणून कशी आहे, हे त्या खुर्चीवर बसल्यानंतर प्रेक्षकांना कळतं. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने मी माणूस म्हणून कशी आहे हे घरोघरी पोहोचवलं.म्हणून मला ती खुर्ची प्रिय आहे’ असं सई म्हणाली.

सई ताम्हणकर सध्या तिच्या बोल बोल राणी या सिनेमाचं प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, श्रेयस तळपदे यांच्यासोबत ती या सिनेमात झळकली आहे.सई सुबोध आणि चिन्मय यांचे त्रिकूट 2008 साली सनई चौघडे सिनेमात दिसलं होतं. आता तब्बल 18 वर्षांनी ते पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *