नवी दिल्ली : आर्थिक संकट आणि अंतर्गत वादाने पोखरलेल्या पाकिस्तानला (Pakistan) एका अत्यंत खळबळजनक बातमीने मोठा धक्का दिला आहे. बलुचिस्तान प्रांताने पाकिस्तानपासून पूर्णपणे वेगळे होत स्वतःला एक ‘स्वतंत्र देश’ (Independent Country) घोषित केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
सोशल मीडियावर ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’ (Republic of Balochistan) या नावाने एक पत्र आणि अधिकृत विधान वेगाने व्हायरल होत आहे. या पत्रात बलुचिस्तानच्या बंडखोर लष्कराने या क्षेत्राच्या तब्बल 85 टक्के भागावर आपला पूर्ण ताबा मिळवला असल्याचा मोठा दावा केला आहे. या बातमीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
Balochistan Viral Letter Claims : नवीन चलन, राष्ट्रगीत लागू केल्याचा दावा
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या कथित पत्रामध्ये बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याबाबत अनेक मोठे दावे करण्यात आले आहेत. त्यामध्ये बलुचिस्तानने स्वतःचा नवा राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, नवीन चलन (Currency) आणि संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था लागू केल्याचे म्हटले आहे.
बलुचिस्तानमधील महत्त्वाचे गॅस प्रकल्प, खनिज साठे आणि कोळशाच्या खाणींवर आता नवीन बलूच सरकारचे पूर्ण नियंत्रण प्रस्थापित झाले आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये काम करणाऱ्या बलूच नागरिकांनी मोठ्या संख्येने आपल्या पदांचे राजीनामे देऊन बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा दिला आहे, असेही या पत्रात नमूद आहे.

Balochistan Vs Pakistan Conflict : आसिम मुनीर अन् शहबाज शरीफ यांच्याविरोधात संताप
बलुचिस्तानमध्ये गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तान सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष आणि मानवाधिकार उल्लंघनाचा मुद्दा गाजत आहे. बलुचिस्तानच्या जनतेने अनेकदा पाकिस्तानातील लष्करप्रमुख आसिम मुनीर (Asim Munir) आणि पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्याविरोधात उघडपणे रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने केली आहेत.
गेल्या काही महिन्यांत या भागात हिंसेचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. बलूच विद्रोही आणि ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (TTP) च्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सुरक्षा दलांना वारंवार लक्ष्य केले आहे. 5 जुलैपासून आतापर्यंत राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन शाबान’ (Operation Shaban) अंतर्गत पाकिस्तानी लष्कर, फ्रंटियर कोर आणि पोलिसांनी मिळून 109 हून अधिक बंडखोरांना ठार केले आहे. एकीकडे हा संघर्ष सुरू असतानाच बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याचं पत्र आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही बातमी वाचा:
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया