Ramesh Mhatre: डॉक्टर महिलेला मारहाण करणाऱ्या रमेश म्हात्रेला जामीन मंजूर, सहा दिवसातच आला बाहेर | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टरांना आणि परिचारिकांना मारहाण केल्याप्रकरणी रमेश म्हात्रेला सहा दिवसातच जामीन मंजूर झाला आहे.

Ramesh mhatre-
Ramesh mhatre-

ठाणे : शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे याने आपल्या साथीदारांसह डोंबिवलीतील रुग्णालयात धुडगूस घातल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आणि अवघा महाराष्ट्र हादरला. महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टरांना आणि परिचारिकांना मारहाण केल्याप्रकरणी रमेश म्हात्रेला सहा दिवसातच जामीन मंजूर झाला आहे. कल्याण कोर्टाने रमेश म्हात्रेला जामीन मंजूर केला आहे.

डॉक्टर आणि नर्सला झालेली ही मारहाण पाहून सर्व राज्याला धक्का बसला. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेनं त्याच्या गुंड प्रवृत्तीच्या साथीदारांसह हल्ला केला होता. हॉस्पिटलमध्ये मारहाण करताना, गोंधळ घालताना या म्हात्रेला काही झालं नाही. त्याचा रक्तदाबही नॉर्मल होता. त्याने पत्रकार परिषदही घेतली होती. मात्र गुन्ह्याबद्दल अटक केल्यानंर लगेचच रमेश म्हात्रेला उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला आणि त्याला रुग्णलयात दाखल करण्यात आले होते.

 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर  

रमेश म्हात्रे याची याची तब्येत खराब आहे रमेश म्हात्रेला एकच किडनी असून त्याचा रक्तदाबदेखील वाढला आहे. आहे. एवढचं नाही तर त्यासा ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अखेर वैद्यकीय अहवालाच्या आधारे न्यायालयाने त्याला जामीन दिला आहे. ⁠न्यायाधीश के एस कातकाडे यांनी 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

डॉक्टरांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार?

डॉक्टरांनी फोन उचलला नाही, या कारणावरून रुग्णालयात जाऊन डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याचा आरोप रमेश म्हात्रेवर आहे. डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या म्हात्रेला डॉक्टरांच्या छत्रछायेखाली जावं लागलं. मात्र रुग्णांची सेवा करताना डॉक्टरांवर होणारे हल्ले गंभीर आहेत. परिणामी डॉक्टरांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. डॉक्टर संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात येतेय. मात्र जो पर्यंत रमेश म्हात्रेला कठोर शिक्षा होणार नाही, तोपर्यंत अशा प्रवृत्तींना आळा बसणार नाही.

सिव्हिल रुग्णालयात भरती करण्याची गरज का भासली?

रमेश म्हात्रे प्रकण संशयास्पद होऊ लागलंय. कारण अटक केलेल्या रमेश म्हात्रेला कल्याण-डोंबिवलीतील रुग्णालयाऐवजी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात का नेण्यात आलं? त्यानंतर थेट ठाणे सिव्हिल रुग्णालयात भरती करण्याची गरज का भासली? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची गरज आहे. पोलिस कोठडीऐवजी रुग्णालयातच मुक्काम करण्यासाठी म्हात्रेची नाटकं सुरू असल्याचा आरोप केला जातोय. तर दुसरीकडे मारहाण प्रकरणी निषेधाचं सत्र सुरूच आहे. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील नर्सेसकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. डॉक्टरांच्या संघटना, नर्सेस आणि विविध वैद्यकीय संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

हे ही वाचा :



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *