‘रामायण’ येण्यापूर्वी आयोध्येत प्लॉट; आता रणबीर कपूरचा ‘मुळशी पॅटर्न’! पुण्यात मोठी गुंतवणूक, किंमत किती माहितीय?


Ranbir Kapoor Real Estate Investment in Pune: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या 4000 कोटींचं बजेट असलेल्या ‘रामायण’ (Ramayan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी आयोध्येत मोठी गुंतवणूक केली होती. एका आलिशान प्लॉट डेव्हलपमेंट प्रोजेक्टमधील जमीन घेतल्यानंतर आता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) आपल्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओमध्ये आणखी भर घातलीय. रणबीरने पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात 25.7 एकर जमीन खरेदी केली आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, रणबीरने चार स्वतंत्र व्यवहारांद्वारे ही जमीन विकत घेतली असून या व्यवहारांची एकूण किंमत 16.42 कोटी रुपयांहून अधिक आहे.

किती कोटींचा झाला व्यवहार?

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यवहार 30 एप्रिल 2026 रोजी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मुळशीतील पिंपरी गावात असलेल्या चार लागून असलेल्या भूखंडांचा या खरेदीमध्ये समावेश आहे. या व्यवहारात सर्वात मोठा 43,800 चौरस मीटरचा भूखंड 7.07 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आला. याशिवाय 29,900 चौरस मीटरचा भूखंड 4.62 कोटी, 21,400 चौरस मीटरचा भूखंड 3.31 कोटी आणि 8,900 चौरस मीटरचा सर्वात लहान भूखंड 1.39 कोटी रुपयांना विकत घेण्यात आला. सध्या रणबीर कपूरने ही जमीन नेमक्या कोणत्या उद्देशाने खरेदी केली आहे, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मुळशी परिसरात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करून खासगी बंगले, सेकंड होम्स, लक्झरी व्हिला किंवा हॉस्पिटॅलिटी प्रकल्प उभारण्याचा ट्रेंड वाढत असल्याचे रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

सेलिब्रेटींचा रियल इस्टेट ट्रेंड 

गेल्या काही वर्षांत मुळशी हा श्रीमंत गुंतवणूकदार, उद्योगपती आणि सेलिब्रिटींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. मुंबईपासून तुलनेने जवळ असलेला हा निसर्गरम्य परिसर लक्झरी जीवनशैली, विकेंड होम्स आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पसंतीचा पर्याय बनला आहे.रणबीर कपूरची ही गुंतवणूक बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये वाढत असलेल्या नव्या ट्रेंड सारखीच वाटत आहे.  अलिबाग, लोणावळा, पुणे आणि गोवा यांसारख्या ठिकाणी अनेक अभिनेते आणि सेलिब्रेटींनी फार्म हाऊस, वीकेंड होम , तसेच प्रीमियम निवासी प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. अशा गुंतवणुकीकडे केवळ लक्झरी लाइफस्टाइल नव्हे, तर भविष्यातील संपत्ती निर्मितीचा पर्याय म्हणूनही पाहिले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *