कोंबडा नव्हे हा तर ‘सिक्युरिटी गार्ड’, सोलापूरच्या शेतकऱ्याचा विकायला नकार, का आहे खास? Video | शेती बातम्या


Last Updated:

Solapur News: या कोंबड्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ एक पक्षी नसून, अरुण शिंदे यांच्या पूर्ण फार्मचा ‘सुरक्षारक्षक’ (सिक्युरिटी गार्ड) बनला आहे.

+

कोंबडा

कोंबडा नव्हे हा तर ‘सिक्युरिटी गार्ड’, सोलापूरच्या शेतकऱ्याचा विकायला नकार, का आहे खास? Video

सोलापूर: शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन केले जाते, मात्र सोलापूर जिल्ह्यातील कामती खुर्द येथील एका शेतकऱ्याने या व्यवसायातून एक वेगळाच आदर्श आणि कौतुकास्पद प्रयोग राबवला आहे. ‘प्रोशक्ती ऍग्रो फार्म’चे संचालक अरुण शिंदे गेल्या तीन ते चार वर्षांपासून कुक्कुटपालन आणि बदक पालन करत आहेत. सध्या त्यांच्या फार्मवरील आंध्रप्रदेशातील ‘असील’ जातीचा एक कोंबडा संपूर्ण परिसरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. या कोंबड्यासाठी चक्क 10 ते 12 हजार रुपयांची मागणी आली असतानाही, शिंदे यांनी तो विकण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

5 वर्षांची जोडी आणि तब्बल 5 किलो वजन!

अरुण शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी आंध्रप्रदेशातून ‘असील’ जातीच्या कोंबड्याची पिल्ले आणली. आज त्यांच्याकडे जवळपास पाच वर्षांचा नर कोंबडा आणि एक मादी कोंबडी आहे. हा कोंबडा दिसायला अत्यंत देखणा आणि मजबूत असून, त्याचे वजन तब्बल 4 ते 5 किलो आहे, तर मादीचे वजन अडीच किलोपर्यंत आहे. या जोडीची बाजारातील क्रेझ पाहून एका ग्राहकाने थेट 10 ते 12 हजार रुपयांची बोली लावली होती. मात्र, शिंदे यांनी या मोहाला बळी न पडता आपल्या लाडक्या पक्षाला जवळच ठेवणे पसंत केले.

कोंबडा की सुरक्षारक्षक? 

या कोंबड्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ एक पक्षी नसून, अरुण शिंदे यांच्या पूर्ण फार्मचा ‘सुरक्षारक्षक’ (सिक्युरिटी गार्ड) बनला आहे. फार्मवर जर कोणी अनोळखी व्यक्ती आली, किंवा इतर कोणताही हिंस्त्र प्राणी अथवा पक्षी घुसला, तर हा असील कोंबडा थेट त्यांच्यावर हल्ला करतो आणि फार्मचे रक्षण करतो. त्याच्या या धाडसी स्वभावामुळे फार्मवरील इतर पक्षांचेही रक्षण होते.

विक्री न करण्याचे मुख्य कारण

“या असील जातीच्या पक्षांचे ब्रीडिंग (पैदास) करायचे आहे. या दर्जेदार आणि लढवय्या जातीची संख्या आपल्या भागात वाढवण्याचा माझा मानस आहे. यामुळेच इतकी मोठी किंमत मिळत असतानाही मी या जोडीची विक्री केली नाही,” असे अरुण शिंदे यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितले.

दरम्यान, कमी कालावधीत आपल्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध झालेल्या या कोंबड्याला पाहण्यासाठी आता पंचक्रोशीतील शेतकरी आणि पक्षीप्रेमी कामती खुर्द येथील ‘प्रोशक्ती ऍग्रो फार्म’ला भेट देत आहेत.

मराठी बातम्या/कृषी/

कोंबडा नव्हे हा तर ‘सिक्युरिटी गार्ड’, सोलापूरच्या शेतकऱ्याचा विकायला नकार, का आहे खास? Video



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *