Ketan Agarwal Murder Case : 12 प्रश्न, 5 दिवसांचा तपास, आज कोर्टात उलगडणार केतन हत्याकांडाचं नवं रहस्य? सिया आणि चेतन… – Marathi News | Ketan Agarwal Murder: Siya Chetan Court Hearing, Police to Reveal Key Investigation Finding


18 जून रोजी लोहगडावरून पडून केतन अग्रवालचा मृत्यू (Ketan Agarwal Murder) झाला. मात्र तो अपघात नसून त्याची होणारी पत्नी सिया व तिचा मित्र चेतन यांनी मिळून केलेली हत्या असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांन त्यांना अचक केल्यावर दोघंही पोलिस कोठडीत असून आज 3 जुलै रोजी सिया गोयल आणि चेतन चौधरीची कोठडीची मुदत संपणार आहे. त्यामुळं आज या दोघांना वडगाव मावळ न्यायालयात दुपारी अडीच नंतर हजर केलं जाईल. आता न्यायलय त्यांची पोलीस कोठडी आणखी वाढवेल का याकडे लक्ष आहे.

सियाची लाय डिटेक्टर चाचणी होणार ?

दरम्यान, आता केतन अग्रवाल हत्याकांडातील सत्य लवकरच समोर येणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी सिया गोयल हिने तिची लाय डिटेक्टर टेस्ट म्हणजेच पॉलिग्राम चाचणी करण्यास सहमती दिल्याचे तिचे वकील ॲड विपुल दुशिंग यांनी नमूद केलं. त्यामुळे आता केतन अग्रवाल सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची लाय डिटेक्टर (पॉलीग्राम) चाचणी होण्याची शक्यता आहे. मात्र ही चाचणी करण्यापूर्वी पोलिसांना न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागेल.

आज न्यायालयसमोर सुनावणी 

या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश ए. एम. विभूते यांच्या न्यायालयात होणार आहे. न्यायालयात सिया हिची बाजू ॲड. विपुल दूशिंग मांडणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ॲड आशुतोष श्रीवास्तव यांनी या प्रकरणातून माघार घेतल्याची चर्चा सुरू आहे.

चेतन चौधरीच्या वतीने ॲड. राधिकेश उत्तरवार आणि ॲड हे दोघे राम शहाणे युक्तिवाद करतील, तर सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील राजश्री विरकुड मांडणार आहेत.

दरम्यान, आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यापूर्वी गेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेले महत्त्वाचे धागेदोरे आणि पुरावे आज न्यायालयासमोर सादर केले जाणार आहेत.

पोलिसांकडून न्यायालयासमोर अनेक मुद्दे मांडले जाणार असून त्यात महत्वाचे अनेक खुलासे होऊ शकतात. सिया आणि केतन यांची पाच दिवसांची रिमांड कशासाठी घेण्यात आली अन कोणते धागेदोरे हाती लागले? हेही त्यात सपष्ट होऊ शकेल.

आतापर्यंत कोणकोणते धागेदोरे हाती लागले?

१) कट कुठे रचला गेला?

– पुण्यातील लुल्लानगर येथील एका कॅफेमध्ये बसून हत्येचा कट रचल्याचा संशय.

– त्या ठिकाणी सियाला नेऊन पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

२) हत्येचा सराव कुठे झाला?

– पुण्यातील लुल्लानगरमधील टेकडीवर हत्येचा सराव करण्यात आल्याचा अंदाज.

-सियाला घटनास्थळी नेऊन संपूर्ण घटनाक्रमाची पडताळणी करण्यात आली.

३) डिलीट केलेला डेटा रिकव्हर

– सिया, चेतन आणि कामगार नीरज कुमार यांच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा फॉरेन्सिक लॅबमध्ये रिकव्हर करण्यात आला.

– डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी करण्यात आली.

४) गुन्ह्यानंतर कोणाशी संपर्क झाला?

– हत्या झाल्यानंतर सिया आणि चेतन यांनी कोणाला भेटले किंवा कोणाशी संवाद साधला का, याचा तपास.

– त्यांनी कट किंवा हत्येबाबत कुणाकडे कबुली अथवा चर्चा केली होती का, याची चौकशी करण्यात आली.

५) घटनाक्रमाचे रिक्रिएशन

– सिया गोयल हिच्यानंतर चेतनलाही घटनास्थळी नेऊन क्राईम सीन रिक्रिएशन करण्यात आले.

– चेतनच्या हालचालींचे (Gait Analysis) विश्लेषण करून पुरावे गोळा करण्यात आले.

६) लोहगडवरील हालचाली आणि सीसीटीव्ही तपास

– हत्येच्या दिवशी लोहगडावर सिया आणि चेतन यांनी कोणाशी संवाद साधला का, याचा तपास.

– सीसीटीव्ही फुटेजमधील त्यांच्या हालचाली आणि संवादाची पडताळणी करण्यात आली.

७) यापूर्वीही हत्येचा प्रयत्न झाला होता का?

– ३१ मे, ४ जून आणि १४ जून रोजीही हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता का, याचा तपास.

– यासाठी संबंधित ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

८) केतनचा पासपोर्ट

– खालापूर टोलनाक्यावरील फूड मॉलमध्ये जाऊन केतनचा पासपोर्ट शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

९) नव्या साक्षीदारांचे जबाब

– काही नवे साक्षीदार समोर आल्याचा पोलिसांचा दावा.

– या साक्षीदारांची आणि आरोपींची समोरासमोर चौकशी करण्यात आली.

१०) लोहगडची आधी रेकी झाली होती का?

– हत्येपूर्वी सिया आणि चेतन यांनी लोहगड किल्ल्याची किती वेळा रेकी केली, याचा तपास.

– कट रचण्यासाठी त्यांनी किती वेळा भेटी घेतल्या, याचीही चौकशी झाली.

११) हत्येच्या कटात आणखी कोणाचा सहभाग?

– सिया आणि चेतन व्यतिरिक्त आणखी एखादी व्यक्ती या कटात सहभागी होती का, याचा तपास सुरू आहे.

१२) हत्येच्या दिवशी वापरलेल्या वस्तू जप्त

– सियाने हत्येच्या दिवशी परिधान केलेले कपडे तिच्या मार्केटयार्ड येथील घरातून जप्त करण्यात आले.

– चेतनने वापरलेली पँट जप्त करण्यासाठीही पोलिसांनी कारवाई केली.

पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रिमांडच्या बारा कारणांची उत्तरं शोधण्यात आली. यातून जे धागेदोरे हाती लागलेत, ते आज न्यायालयात सादर केले जातील. यातून काय धक्कादायक माहिती समोर येते का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *