अखेर केतनच्या हत्येचं गूढ उकलणार, सिया गोयल घडाघडा सत्य बोलणार, पोलिसांना मोठं यश! – Marathi News | Pune ketan agarwal murder case siya goyal given permission to do lie detector test to police


Ketan Agarwal Muder Case : पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रातील कोट्यधीश केतन अग्रवाल हत्याकांडात रोजच नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. या हत्येप्रकरणी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि सिया गोयलचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य काय ते बाहेर काढण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, आता केतन अग्रवाल हत्याकांडातील सत्य लवकरच समोर येणार आहे. कारण मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी सिया गोयल हिने तिची लाय डिटेक्टर टेस्ट म्हणजेच पॉलिग्राम चाचणी करण्यास परवानगी दिलेली आहे.

न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार

सिया गोयलची बाजू मांडणारे अॅड विपुल दुशिंग यांनी सियाने लाय डिटेक्टर चाचणी करण्यास सहमती दर्शवल्याचे सांगितले आहे. त्यानंतर आता केतन अग्रवाल सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची लाय डिटेक्टर (पॉलीग्राम) चाचणी होण्याची शक्यता आहे. लाय डिटेक्टर चाचणी करण्याआधी पुणे ग्रामीण पोलिसांना न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. न्यायालयाकडून ही परवानगी मिळताच लाय डिटेक्टर चाचणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

महत्त्वाच्या मुद्द्यांची पडताळणी करण्यासाठी चाचणीचा वापर

लाय डिटेक्टर चाचणीसाठी न्यायालयाची परवानगी घेण्यासाठी आरोपी सिया गोयलला 3 जुलै रोजी वडगाव न्यायालयात हजर केले जाणार आहे. न्यायालयाने ही चाचणी करण्याची परवानगी देताच सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचे जबाब पुन्हा नोंदविण्यात येणार आहेत. तपासातील विसंगती आणि महत्त्वाच्या मुद्द्यांची पडताळणी करण्यासाठी चाचणीचा वापर होणार आहे. लाय डिटेक्टर चाचणीतील निष्कर्षांच्या आधारे पुढील तपासाची दिशा निश्चित केली जाणार आहे.

केतनची हत्या झालीच नाही

तपास पथकाकडून आरोपींच्या कथनाची वैज्ञानिक पद्धतीने पडताळणी केली जाईल. या प्रक्रियेमुळे पोलिसांना तपासात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागू शकतात. दरम्यान, याआधीच्या न्यायालयाच्या सुनावणीत सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या वकिलांनी पोलीस कोठडी देऊ नये, अशी मागणी न्यायालयाला केली होती. तसेच केतन हा गडावरून पाय घसरून पडला आहे. त्याची हत्या झालेली नाही, असाही दावा आरोपींच्या वकिलांनी केला होता. आता पुन्हा एकदा न्यायालयात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *