4000 Crore Ramayana Scene Leaked: मोठ्या बजेटच्या सिनेमांची (Big Budget Movies) खरी चर्चा अनेकदा ते प्रदर्शित होण्यापूर्वीच सुरू होते. कधी एखादं पोस्टर लोकांचं लक्ष वेधून घेतं, तर कधी सिनेमाची एखादी छोटीशी झलक इंटरनेटवर धुमाकूळ घालते. सध्या ‘रामायणम’ (Ramayanam) सिनेमाबाबतही असंच काहीसं वातावरण निर्माण झालंय. हा सिनेमा अद्याप प्रदर्शित झालेला नसला तरी, सोशल मीडियावर त्याबद्दलची चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता, रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) झलक असलेली 11 सेकंदांची एक क्लिप समोर (Ramayana Scene Leaked) आलीय, ज्यामुळे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचलाय आणि हा व्हिडीओ सर्वत्र चर्चेचा विषय ठरलाय.
आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांनंतर क्लिप व्हायरल (4000 Crore Ramayanam Movie Clip Viral)
अलिकडेच, एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात निवडक प्रेक्षकांसाठी ‘रामायणम’मधील काही सीन्स दाखवण्यात आलेले. त्यानंतर काही वेळातच, रणबीर कपूरची झलक असलेली 11 सेकंदांची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या फुटेजमध्ये सिनेमातील युद्धाच्या एका महत्त्वाच्या सीन्सचा समावेश असल्याचा दावा केला जातोय. मात्र, या व्हायरल व्हिडीओबाबत सिनेनिर्मात्यांनी अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही.
Shocking 🚨🚨🚨#RanbirKapoor ‘s Scene From #Ramayana gets Leaked. ⚠️⚠️⚠️
The scene which was shown at the CinemaCon event is circulating on Reddit 🔴#Ramayana | #Ranbirkapoor | #Imaxpic.twitter.com/H0MiSLSUQ0
— Aad!7 (@Aadi_memorable7) July 1, 2026
रणबीरच्या ॲक्शन सीन्समुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह (Ramayana Ranbir Kapoor Action Scene Viral)
व्हायरल झालेल्या एका क्लिपमध्ये रणबीर कपूर धनुष्यबाण चालवून एका बलाढ्य राक्षसाशी लढताना दिसतोय. ही क्लिप अवघ्या काही सेकंदांची असली तरी, तिनं चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केलाय. सोशल मीडियावर लोक रणबीरचा लूक, त्याची पडद्यावरील उपस्थिती आणि सिनेमाचा भव्य व्हिज्युअल स्केल यांची मुक्तकंठानं प्रशंसा करत आहेत. ‘रामायण’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरेल, असा अंदाज अनेक युजर्सनी आधीच वर्तवला आहे.
VFX बाबतही चर्चांना सुरुवात (4000 Crore Ramayana VFX)
4000 कोटींच्या व्हायरल क्लिपमुळे VFX बाबतही चर्चा सुरू झालीय. एका कंटेंट क्रिएटरचा असा दावा आहे की, रणबीर कपूरच्या एन्ट्री सीनमध्ये दिसणारे अपूर्ण व्हीएफएक्स हे मुद्दाम ठेवण्यात आले होते, जेणेकरून सिनेमाबद्दल अधिक चर्चा घडून येईल. त्यांच्या मते, थिएटर्समध्ये हा सीन पूर्णपणे वेगळा आणि अधिक दमदार दिसेल. मात्र, या दाव्याला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ सिनेमा दोन भागांत प्रदर्शित होणार असून, त्याचा पहिला भाग या दिवाळीत थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :