लोकल ट्रेनमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, धावत्या ट्रेनमध्ये मद्यपीचा धिंगाणा, विठ्ठलवाडी स्थानकातील धक्कादायक प्रकार


Mumbai News : लोकल ट्रेनमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. महिलांच्या डब्यात घुसून धावत्या ट्रेनमध्ये मद्यपीने धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार विठ्ठलवाडी स्थानकात घडला आहे. अंबरनाथ-मुंबई लोकलमध्ये हा थरार पाहायला मिळाला. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

रेल्वे पोलिसांच्या गस्तीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास महिला प्रवाशांना सहन करावा लागला मनस्ताप. मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये महिलांची सुरक्षा पुन्हा एकदा  वेशीवर टांगली गेली आहे. धावत्या लोकलमध्ये महिला डब्यात एका मद्यपीने जोरदार धिंगाणा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये उल्हासनगर ते विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान हा प्रकार घडला. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने महिला प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर विठ्ठलवाडी स्थानकात इतर प्रवाशांच्या सतर्कतेमुळे या मद्यपीला पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मात्र, या घटनेमुळे रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कालच मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक घटना, दोन तृतीयपंथीय प्रवाशाला बेदम मारहाण 

दरम्यान, कालच मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक घटना घडली होती.  लोकमध्ये हाणामारीचा प्रकार समोर आला आहे. रात्री उशिरा धावत्या ट्रेनमध्ये रेल्वे प्रवासी आणि तृतीयपंथीय यांच्यात फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या मध्ये दोन तृतीयपंथीय प्रवाशाला बेदम मारहाण करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या घटनेमुळं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.  

मारहाणीचे कारण अद्याप स्पष्ट नाही

दरम्यान, लोकल ट्रेनमध्ये झालेल्या हाणामारीच्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या हाणामारीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रेल्वे प्रशासनाकडून या घटनेची माहिती घेतली जात आहे. दोन तृतीयपंथीय प्रवाशाला बेदम मारहाण केल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान, अलिकडच्या काळात दिवसें दिवस मुंबई लोकलमधील हाणामारीच्या आणि हिंसेच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. किरकोळ वाद किंवा जागेवरून झालेल्या वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत होत आहे. या वाढत्या घटनांमुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरत असल्याचे चित्र देखील पाहाया मिळत आहे. 

मुंबई लोकलमध्ये दिवसेंदिवस हाणामारीच्या घटना वाढताना दिसत आहेत

दरम्यान, मुंबई लोकलमध्ये दिवसेंदिवस हाणामारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. काही आठवड्यांपूर्वी एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये जोरदार हाणामारीची घटना घडल्याचे समोर आलं आहे. या हाणामारीत दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लोकलमधील हाणामारीच्या घटना वाढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर-अंबरनाथ लोकलमध्ये सीटवर झोपलेल्या प्रवाशाला उठवल्याने वादाला सुरुवात झाली. लोकलमधील या वादामुळे दोन गट आमनेसामने आले. डोंबिवली स्थानकानंतर धावत्या लोकलमध्येच दोन्ही गटाची तुफान हाणामारी झाली. एकाने लोखंडी कड्याने जीवघेणा हल्ला केला. या मारहाणीत प्रितेश कनोजिया आणि राजू वाघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलविण्यात आले. कल्याण रेल्वे पोलिसांकडून दोन्ही जखमींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *