रोहित हिट, तर केएल राहुलचं आता काही खरं नाही! वनडे मालिकेतील रेकॉर्ड पाहिलात का? – Marathi News | Rohit Sharma has outperformed other batsmen in the last three ODI series while KL Rahul has delivered a poor performance


रोहित हीट, तर केएल राहुलचं आता काही खरं नाही! वनडे मालिकेतील रेकॉर्ड पाहिलात का?Image Credit source: PTI

भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेतील स्थितीचा आढावा घेऊन खेळाडूंची वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी चाचपणी करत आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीची प्रत्येक मालिका ही खेळाडूंची परीक्षा असणार आहे. दक्षिण अफ्रिकेतील स्थिती इंग्लंडच्या खेळपट्ट्यांशी मिळती जुळती आहे. त्यामुळे इंग्लंड मालिका महत्त्वाची होती. त्या दृष्टीने खेळाडूंची निवड आणि त्याची परीक्षा घेतली गेली. खरं तर या मालिकेतील शेवटच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माचं संघातील स्थान डळमळीत आहे. दुसरीकडे, इतर खेळाडूंवर भरवसा ठेवून संघ बांधणी करणं कठीण झालं आहे. कारण रोहित शर्माच्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत असताना इतर खेळाडूंनी काही खास कामगिरी केली नाही. त्यामुळे त्यांच्यावर किती विश्वास टाकावा? हा प्रश्न उपस्थित होत आहे. मागच्या वनडे मालिकांची आकडेवारी काढली तर रोहित शर्मापेक्षा सुमार कामगिरी करणारे काही खेळाडू आहेत.

रोहित शर्मा आणि इतर फलंदाजांची कामगिरी

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माने मागच्या तीन वनडे मालिकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण असं असूनही वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी संघातील स्थान काही निश्चित नाही. त्यामुळे त्याला पुढच्या मालिकेतून डावलणार अशा वावड्या उठल्या आहेत. रोहित शर्माने मागच्या तीन वनडे सामन्यात सर्वाधिक धावा केल्या आहे. रोहित शर्माने 9 वनडे सामन्यात 534 धावा केल्या आहे. इतर फलंदाजांना 300चा आकडाही गाठता आलेला नाही. विदेशात खेळलेल्या गेलेल्या मागच्या तीन वनडे मालिकांमध्ये शुबमन गिलने 9 सामन्यात 288, विराट कोहलीने 276 आणि अक्षर पटेलने 214 धावा केल्या आहे. श्रेयस अय्यरही मागच्या तीन वनडे मालिकेतील 8 सामन्यात फक्त 211 धावा करू शकला आहे. वॉशिंग्टन सुंदरने 7 डावात 126 धावा केल्या आहे.

केएल राहुलची सुमार कामगिरी

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी केएल राहुलकडे विकेटकीपर फलंदाज म्हणून मुख्य योजनेचा भाग म्हणून पाहिलं जात आहे. पण त्याने मागच्या तीन वनडे मालिकांमध्ये सुमार कामगिरी केली आहे. त्याने फक्त 93 धावा केल्या आहे. त्याने सहा वनडे सामने खेळले आहेत. त्यामुळे त्याची कामगिरी पाहून क्रीडाप्रेमींना धक्का बसला. दरम्यान, दक्षिण अफ्रिकेत केएल राहुल वनडेत 5 डाव खेळला आहे. त्याने त्याने 30.60 च्या सरासरीने 153 धावा केल्या आहेत. त्याची 56 ही सर्वोत्तम खेळी आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *