Weekly Horoscope 20 To 26 July 2026: आजपासून जुलै (July 2026) महिन्याच्या नव्या आठवड्याची सुरूवात झाली आहे, ज्योतिषशास्त्रानुसार हा आठवडा अनेकांचे नशीब पालटणारा ठरणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे काही राशींसाठी हा आठवडा अत्यंत भाग्यशाली ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरेल. या आठवड्यात आषाढी एकादशी देखील येत आहे. त्यामुळे हा आठवडा कोणत्या राशींसाठी आर्थिक, करिअर, प्रेम जीवनात कशाप्रकारे बदल घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज आपण तूळ ते मीन अशा सहा राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांना नव्या आठवड्यात करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते. नवीन नोकरी किंवा पदोन्नतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रेमजीवनात रोमँटिक क्षण अनुभवायला मिळतील. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढेल. आरोग्य चांगले राहील, मात्र गोड पदार्थांचे प्रमाण कमी ठेवा.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी हा आठवडा सकारात्मक राहील. नोकरीत नवीन प्रकल्प हाती येऊ शकतो. व्यवसायात विस्ताराची संधी मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल. आर्थिकदृष्ट्या लाभाचे योग आहेत. आरोग्याच्या दृष्टीने नियमित व्यायाम आणि योग करणे फायदेशीर ठरेल.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी या आठवड्यात महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील, पण घाई करू नका. प्रेमजीवनात जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. आर्थिक स्थिती स्थिर राहील. आरोग्याच्या बाबतीत प्रवासामुळे थकवा जाणवू शकतो.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी हा आठवडा यशदायी ठरेल. वरिष्ठांचा विश्वास जिंकाल. व्यवसायात नफा वाढण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. आर्थिकदृष्ट्या नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. आरोग्य चांगले राहील, पण कामाचा ताण कमी ठेवण्याचा प्रयत्न करा.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी या आठवड्यात मेहनतीचे योग्य फळ मिळेल. नोकरीत प्रगती होईल. व्यवसायात नवीन गुंतवणुकीचा विचार करू शकता. प्रेमजीवन आनंदी राहील. आर्थिक व्यवहारात लाभाचे संकेत आहेत. आरोग्याच्या बाबतीत त्वचेची किंवा अॅलर्जीची समस्या जाणवू शकते
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी हा आठवडा समाधानकारक ठरेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधांमध्ये नाते अधिक मजबूत होईल. आर्थिकदृष्ट्या चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत नियमित व्यायाम आणि संतुलित आहारावर भर द्या.
हेही वाचा :
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)