मोठी बातमी! नाशिक विधान परिषद निवडणुकीतील सस्पेन्स संपला, अखेर गोकुळ गीतेंची भूमिका जाहीर, घेतला मोठा निर्णय – Marathi News | Gokul geetes support to narendra darade in the nashik legislative council elections


गोकुळ गीते यांची माघार Image Credit source: टीव्ही 9 मराठी

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. नाशिक विधान परिषदेची जागा ही महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली होती, या विधान परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून नरेंद्र दराडे यांना उमेदेवारी देण्यात आली आहे. मात्र गोकुळ गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने नरेंद्र दराडे यांची धाकधूक वाढली होती. मात्र आता गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. गोकुळे गीते यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता नरेंद्र दराडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज या सर्व पार्श्वभूमीवर गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते यांच्या निवासस्थानी महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये गिरीश महाज यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी गणेश गीते यांनी आधीच भाजपच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी देखील या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र ही जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली. शिवसेना शिंदे गटाकडून नाशिक विधान परिषदेसाठी नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला  होता. मात्र गोकुळ गीते यांनी ही निवडणूक लढवण्याची भूमिका घेत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता.

परंतु आता गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या शिष्टाईला यश आलं आहे. गोकुळ गीते यांनी या निवडणुकीत दराडे यांना पाठिंबा दिला आहे. गोकुळ गीते यांनी या निवडणुकीमधून माघार घेतली आहे. त्यामुळे महायुतीचं नाशिक विधान परिषद निवडणुकीमधील सर्वात मोठं टेन्शन दूर झालं आहे. अखरे गीते यांचं बंड थोपवण्यात यश आलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *