तीन तासांपासून खलबतं… दोन बडे नेते मुक्काम ठोकून, नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; गोकूळ गीते माघार घेणार की झुलवणार? – Marathi News | Nashik mlc election gokul gite rebellion girish mahajan uday samant meeting mahayuti crisis


राज्यातील विधान परिषद निवडणुकीत सर्वात जास्त नाशिकच्या जागेची आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना महायुतीकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे. मात्र भाजपच्या गोकूळ गीते यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केलेली आहे. ही बंडखोरी शमवण्यात आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेला यश आलेले नाही. दररोज महायुतीचे नेते बैठका घेत आहेत, गोकूळ गीते यांच्याशी चर्चा करत आहेत, मात्र अद्याप गोकूळ गीते यांनी माघार घेतलेली नाही किंवा नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिलेला नाही. अशातच आता गीते यांच्या उमेदवारीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

3 तासांपासून खलबतं

आज भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे मंत्री आणि नेते उदय सामंत नाशिकमध्ये आहेत. या दोन्ही नेत्यांनी आज गोकूळ गीते यांची भेट घेतली. या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास 3 तासांपासून खलबतं चालू आहेत. मात्र अद्यापही गीते यांनी माघार घेण्याचा किंवा दराडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळत आहे.

एकत्र पत्रकार परिषद होणार

समोर आलेल्या माहितीनुसार, महायुतीच्या नेत्यांची गोकुळ गीते यांच्या सोबत सुरू असलेली बैठक संपली आहे. या बैठकीत गोकुळ गीते यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आली. यावेळी गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांचा मुलगा कुणाल दराडे यांच्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती समोर आली आहे. आता थोड्याच वेळात गोकुळ गीते, उदय सामंत, गिरीश महाजन एकत्र पत्रकार घेणार असून परिषदेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे नाशिकसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

गीते यांच्या निर्णयाकडे लक्ष

गोकुळ गीते यांनी केलेली बंडखोरी चर्चेचा विषय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप केला होता, मात्र अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. आज महायुतीच्या दोन मंत्र्यांनी गीते यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता गीते काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *