Pandharpur Pick Up Accident: पंढरपूर तालुक्यातील अख्ख्या रांजणी गावावर शोककळा; पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा करुण अंत, दैव बलवत्तर असल्याने 6 जणांचा जीव वाचला


Pandharpur Pick Up Accident: म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शन घेऊन परतून येत असताना 14 प्रवासी असलेली पिकअप थेट विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. पंढरपूर तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला.सुदैवाने 6 जणांना जिवंत वाचवण्यात यश आले असून त्यांना उपचारासाठी पंढरपूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शासकीय यंत्रणा पोहोचण्यापूर्वी स्थानिकांनी केलेल्या अथक प्रयत्नांनी 6 जणांचा समावेश आहे. मृतांमध्ये पंढरपूर तालुक्यातील सर्व रांजणी गावचे असल्याने अवघ्या गावावर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर पिकअपमधील सर्वजण मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, बचावकार्य युद्धपातळीवर झाल्याने सहा जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलं. ही विहीर अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचे सुद्धा समोर आलं आहे. या विहीरीविरोधात तक्रार सुद्धा करण्यात आली होती. 

नेमका अपघात कसा घडला?

म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी भाविक आले असतानाविहिरीत पिकअप वाहन पडले. गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक विहिरीत पिकअप गाडी पडल्याने ही दुर्घटना घडली. त्यानंतर, स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *