Last Updated:
सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील राजनी गावात ही घटना घडली आहे. या घटनेत 14 जणांचा एक ग्रुप म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेला होत.
Solapur News : सोलापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत पिकअप गाडी विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील राजनी गावात ही घटना घडली आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेतील मृतांपैकी 8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.तर इतरांच्या मृतदेह बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर काम सूरू आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील राजनी गावात ही घटना घडली आहे. या घटनेत 14 जणांचा एक ग्रुप म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेला होत. यानंतर परतीच्या प्रवासात रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वॅन कोसळून या 14 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. म्हसवड तांदुळवाडी रस्त्यावर हा अपघात घडला आहे.
विशेष म्हणजे हे सगळे 14 जण पंढरपूर तालुक्यातील रांजनी गावचे आहेत. या घटनेनंतर मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सूरू आहे.
Solapur,Maharashtra
