Washim Crime News: वाशिमच्या तिवळी गावात पत्नीसह दोन मुलींना हात बांधून विहिरीत ढकललेल्या पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. त्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण तिवळी गाव हळहळलं. (Washim Crime News)
कौटुंबीक वादातून 35 वर्षीय संतोष बकाल यांनी आपल्या 28 वर्षीय पत्नी इंद्रायणी बकाल आणि 7 वर्षीय जान्हवी बकालसह 5 वर्षीय मुलगा सोहम बकाल यांना विहिरीत ढकलले. त्यानंतर स्वतः संतोष बकालने महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेऊन जीवन संपवलं. इंद्रायणीसह दोन्ही चिमुकल्या मुलांचे हात बांधलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती गावात आगीसारखी पसरली शिरपूर जैन पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. (Washim Crime News)
प्रकरणाची गुंतागुंत वाढली- (Washim Crime News)
एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने तिवळी गावासह जिल्हा हादरून गेला. मात्र, बहीण इंद्रायणीसह दोन चिमुकल्याचा आणि जावाई संतोष बकाल यांचा मृत्यू झाल्याने आत्महत्या नसून घातपात झाल्याचा संशय मृतकाच्या नातेवाईकाने केला आहे. संतोषचा भाऊ संपत्तीवरुन नेहमी संतोष आणि त्यांच्या पत्नीसोबत वाद घालत मारहाण करत असल्याचा आरोप मृतक महिलेचा भाऊ सुधाकर इंगोले यांनी केल्याने प्रकरणाची गुंतागुंत वाढली असली तरी पोलिसांकडून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच प्रकरण नेमकं काय घडले यावर भाष्य करणार असल्याचं सांगितलं. तरी मात्र, नेमक एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूच गूढ कायम असल्याने नेमकं या प्रकरणाकडे संपूर्ण वाशिम जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. (Washim Crime News)
यवतमाळच्या रुग्णालयातच परिचारिका महिलेला संपवलं- (Yavatmal Crime News)
यवतमाळच्या जुन्या श्रोत्री या जुन्या खाजगी रुग्णालयामध्ये परिचारिका महिलेची धारदार शस्त्राचे धाव घालून हत्या करण्यात आली. कुसुम चांदेकर असे हत्या झालेल्या परिचरिकेचे नाव आहे. कुसुम चांदेकर ही महिला रुग्णालयामध्ये कर्तव्य बजावत असताना तिच्यावर हा प्राणघातक हमला झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. नेमकी हत्या का करण्यात आली याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान या प्रकरणातील मारेकरी मात्र घटनास्थळावरून पसार झाला. अवधूतवाडी पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात सहा हत्येच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या